तामसवाडी ता.रावेर येथे नियमित लसीकरण सत्र संपन्न…
तामसवाडी ता.रावेर- प्रतिनिधी (राजेश वसंत रायमळे)- दि.१९/१०/२०२१
तामसवाडी ता.रावेर येथे गरोदर माता व लहान बालकांचे नियमित लसीकरण सत्र संपन्न झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासनामार्फत महिला व बालकल्याण कामी विविध योजना व अभियानांतर्गत विविध प्रारच्या आरोग्य वर्धक गोळ्या आणि लसीकरणाच्या सुविधा उपलब्ध करण्यात येतात.याचाच एक भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोड ता.रावेर अंतर्गत तामसवाडी ता.रावेर येथे दर महिन्याला गरोदर माता व लहान बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्याच्या दृष्टिकोनातून लसीकरण सत्र राबविण्यात येते.त्याप्रमाणे आजच्या या लसीकरण सत्रात बालकांना नियमित लसीकरण करून गरोदर मातांना कॅल्शियम आणि फाॅलिक ऍसिडच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या व लसीकरण सत्र उत्साहात संपन्न झाले.
लसीकरण सत्र यशस्वीतेसाठी आरोग्य सेविका श्रीमती एस.पी.ढालवाले,आरोग्य सेवक श्री आर.एस.भालेराव,आंगणवाडी सेविका श्रीमती शोभाबाई बाजीराव चौधरी,आशा वर्कर श्रीमती सुरेखा नेमाडे आदिंनी परिश्रम घेतले.
यावेळी गावचे पोलीस पाटील सुलक्षणा राजेश रायमळे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य गरोदर माता आणि लहान बालकांनी सहभाग नोंदवत लसीकरण सत्राचा लाभ घेतला.