तामसवाडी ता.रावेर अतिशय भक्तीमय आणि शांततापूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

तामसवाडी ता.रावेर – प्रतिनिधि ( राजेश वसंत रायमळे )

आज अनंत चतुर्दशी निमित्त अतिशय भाऊकतेत भक्तीमय आणि शांततापूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तामसवाडी ता.रावेर येथे एक गांव एक गणपती या संकल्पनेनुसार गावांत एकाच गणपतीची स्थापना करण्यात आली. होती.गणरायाच्या आगमनापासून आजपर्यंत मोठ्या भक्तीभावाने गणरायाची आराधना करीत गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला मात्र आज अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन करून गणरायाला निरोप देण्याची वेळ येताच अतिशय भाऊक होऊन,
“रिकामे झाले घर
रिकामा झाला मखर,
पुढच्या वर्षी लवकर येण्यास
निघाला माझा लंबोदर”…!!
अशा भाऊक शब्दात दिला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप.
शासकीय निर्देशांचे पालन करत अत्यंत साधेपणात आणि शांततेत गणपती विसर्जन करण्यात आले.

यावेळेस बंदोबस्तासाठी असलेले गृहरक्षा दलाचे सुहास चौधरी,तामसवाडी ग्राम पंचायत सदस्य धनराज देवराम पाटील,गावचे पोलीस पाटील सुलक्षणा राजेश रायमळे आणि दैनिक महाराष्ट्र सारथी तामसवाडी प्रतिनिधि राजेश वसंत रायमळे उपस्थित होते.
विसर्जन शांततेत पार पाडत शांतता व सुव्यवस्था राखणेसाठी गणेशोत्सव मंडळाचे प्रशांत पाटील,श्रीकांत चौधरी,मयूर महाजन,चेतन पाटील,भुषण पाटील,चेतन गणेश पाटील, गणेश पाटील तसेच गणेशोत्सव मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!