श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्ट भोकरी येथे भाजपाचा शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख कार्यकर्ता मेळावा संपन्न
तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधी दि.०४/०९/२०२१ ( राजेश रायमळे )
आज दि.०४ सप्टेंबर २०२१ रोजी श्री क्षेत्र ओंकारेश्वर ट्रस्ट भोकरी येथील सभागृहात भारतीय जनता पार्टीचे वतीने आयोजित समर्थ बुथ अभियानांतर्गत रावेर तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तामसवाडी ता.रावेर येथून जवळच असलेले तिर्थ क्षेत्र श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्ट भोकरी येथील सभागृहात भाजपाच्या वतीने चालू असलेल्या समर्थ बुथ अभियानांतर्गत रावेर तालुका शक्ती केंद्रप्रमुख,बुथ प्रमुख कार्यकर्ता मेळावा आज रोजी घेण्यात आला सदर मेळाव्यास विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यकर्त्यांनी रचनात्मक कामांवर भर द्यावा खा.रक्षा खडसे:-
खा.रक्षा खडसे यांनी विचार व्यक्त करतांना कोरोना महामारीत खासदार निधीतून लसीकरणावर भर दिल्याने ईतर विविध विकास कामे अपूर्ण राहील्याची खंत व्यक्त करीत केंद्रशासनाच्या येऊ घातलेल्या विविध योजनांवर प्रकाश टाकला तसेच शक्ती केंद्रप्रमुख आणि बुथ प्रमुख यांनी जास्तीत जास्त रचनात्मक कामांवर भर द्यावा म्हणून प्रोत्साहन दिले.
बुथ मध्ये समर्थ पणे काम करावे आ.राज मामा भोळे:- आ. राजु मामा भोळे यांनी आपल्या भाषणात राजकारणाची सुंदर अशी व्याख्या केली, ते म्हणालेत की,”आपल्या मनाच्या विरूद्ध जे घडते त्यावर मात करून काम करणे म्हणजेच राजकारण” त्याचबरोबर शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुख यांनी आपल्या बुथ मध्ये समर्थ राहून जनतेत जावून काम करीत रहावे असा सल्ला दिला.
जनतेत पक्षनिष्ठा निर्माण करावी आ.गिरिष महाजन
मा.जलसंपदा मंत्री गिरिष महाजन आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणालेत की,शक्ती केंद्रप्रमुख बुथ प्रमुखांनी मिळून मिसळून काम करावे व जनतेच्या मनात पक्षनिष्ठा निर्माण करून निडरपणे आपली सर्व शक्ती पणाला लावून संघटणा अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करीत राहावे.
या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्य कुशलतेनुसार विविध पदांवर नियुक्तीपत्र देण्यात आले,यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना तालुका संघटक “प्रदीप नरेंद्र पंजाबी (महाराज)यांची भारतीय जनता पक्ष रावेर तालुका शक्ती केंद्रप्रमुख पदी तर श्रीकांत महाजन यांची भारतीय जनता पक्ष युवामोर्चा जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळेस मंचावर मा.जलसंपदा मंत्री गिरिष महाजन,खा.रक्षा खडसे,जि.अध्यक्ष राजु मामा भोळे,जि.प.अध्यक्ष रंजना प्रल्हाद पाटील,प.स.सदस्य नंदकिशोर महाजन,भाजपा ता. अध्यक्ष पद्माकर महाजन,सुरेशजी धक्के,विकास अवसरमल आदी मान्यवर उपस्थित होते……