तामसवाडी ता.रावेर येथे प्रधान मंत्री गरिब कल्याण योजनेअंतर्गत धान्य वाटपास सुरूवात
तामसवाडी प्रतिनिधी – ( राजेश रायमळे )
तामसवाडी ता.रावेर येथे कोविड 19 महामारीमध्ये शासनाकडून चालू असलेल्या प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेंतर्गत माहे आँगस्ट २०२१ ची मोफत धान्य वाटप झपाट्यात सुरू.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,कोविड 19 महामारीत लागु असलेल्या प्रदीर्घ अशा ताळेबंदी मुळे रोजंदारी पुर्णपणे बंद असल्याने देश भारतील हातावर पोट घेऊन जगणाऱ्या गोरगरीब जनतेवर ऊपासमारीची वेळ आली होती त्यामुळे या गोरगरीब जनतेसाठी शासनाकडून मागील वर्षी प्रधान मंत्री गरिब कल्याण योजना सुरू करण्यात आली व गरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात आली मागील वर्षी चालू असलेली ताळेबंदी यावर्षी देखील नियमित झाल्याने सदर योजना माहे मे२०२१ पासून पुढील काही महीने नियमित केलेली आहे. तेव्हा तामसवाडी ता.रावेर येथे माहे आँगस्ट २०२१ ची मोफत धान्य वाटप सुरूवात झाली.
यावेळी गावातील रास्त भाव स्वत धान्य दुकानदार शरद प्रभाकर चौधरी तसेच गावचे पोलीस पाटील सुलक्षणा राजेश रायमळे उपस्थित होते.