पीव्ही सिंधूचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं! उद्या कांस्यपदकासाठी खेळणार
मुंबई प्रतिनिधी
31 जुलै
भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूचे टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. शनिवारी टोकियो येथे महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ताइ जु यिंगकडून सरळ गेममध्ये पीव्ही सिंधूपराभूत झाली. रिओ ऑॅलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूने पहिल्या गेममध्ये ताइ जुविरोधात मोठं आव्हान उभे केलं होतं. पण 40 मिनिटांच्या लढतीत 18-21, 12-21 असा पीव्ही सिंधूचा पराभव झाला.
कांस्यपदकासाठी सिंधूची लढत आता चीनच्या बिंग जिओशी होईल, जिने पहिल्या उपांत्य फेरीत स्वदेशी चेन यू फेईने 21-16, 13-21, 21-12 ने पराभूत केले आहे.
ऑॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सिंधूने चमकदार कामगिरी केली होती. पण उपांत्य फेरीत ती चिनी खेळाडूसमोर संघर्ष करताना दिसली. सिंधू उपांत्य फेरीत पराभूत झाली असली तरी ती पुढील सामना जिंकून देशासाठी कांस्यपदक मिळवू शकते. आता तिला पुढील सामना जिंकून पदकासह तिचा ऑॅलिम्पिक प्रवास संपवायचा आहे.
सिंधूच्या वडिलांनी उपांत्य फेरीनंतर काय सांगितले
हैदराबादमध्ये बसून पीव्ही सिंधूचे कुटुंब उपांत्य सामना पाहत होते. सामन्यानंतर तिचे वडील पी.व्ही.रमना म्हणाले, की ‘जेव्हा खेळाडू लयीमध्ये येऊ शकत नाही तेव्हा हे सर्व घडते. काल ती चांगली लयमध्ये होती आणि अकाने यामागुचीला पराभूत केले होते. आज ताइ जू यिंगने तिला पुनरागमन करुच दिले नाही.‘