पाकिस्तान-वेस्टइंडिजमधील पहिल्या टि-20 सामन्यात पावसाचा व्यत्यय,द्म सामना रद्द

बारबाडोस

29जुलै

पाकिस्तान आणि वेस्टइंडिजमध्ये बुधवारी खेळण्यात आलेल्या पहिल्या टि-20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने याला रद्द करण्यात आले. सामना वीस षटकावरुन कमी करुन 9 षटके करण्यात आला होता. कारण सामन्याच्या सुरुवातीलाच पावसाने व्यत्यय आणला होता.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय केला होता. कीरोन पोलार्डच्या नेतृत्वाखालील वेस्टइंडिजच्या संघाने 9 षटकामध्ये 5 गडी गमवून फक्त 85 धावा केल्या होत्या.

वेस्टइंडिजची सुरुवात चांगली राहिली नाही आणि सलामीचा फलंदाज लेंडल सिमंसला दुसर्‍याच षटकात मानेमध्ये त्रास होऊ लागला यामुळे त्याला मैदान सोडून जावे लागले. सिमंसने सात चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने फक्त नऊ धावा केल्या होत्या.

वेस्टइंडिजचा कर्णधार किरोन पोलार्ड व्यतिरीक्त इतर कोणताही फलंदाज 20 धावसंख्येच्या पुढे गेला नाही. पोलार्डने 9 चेंडूत 1 चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 22 धावा केल्या.

पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हसन अलीने शानदार गोलंदाजी करत दोन षटकामध्ये 11 धावा देऊन दोन गडी बाद केले.

पावसाच्या अडथळ्यामुळे पाकिस्तानच्या डावासह पूर्ण सामन्यालाच रद्द करण्यात आले. आता दोनीही संघातील दुसरा टि-20 सामना शनिवारी गुयानामध्ये खेळला जाईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!