माझे काम संघाला विजय मिळवून देणे आहे – डि स्ल्विा

कोलंबो

29जुलै

श्रीलंका क्रिकेट संघातील आपली भूमिका ही शेवट पर्यंत क्रीझवर टिकून राहून संघाला विजय मिळवून देण्याची आहे असे मत श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू धनंजय डी सिल्वाने व्यक्त केले.

भारत व श्रीलंका संघात बुधवारी खेळण्यात आलेल्या दुसर्‍या टि-20 सामन्यात धनंजय डी सिल्वाने 34 चेंडूत नाबाद 40 धावा करुन श्रीलंकेला चार गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. या विजया बरोबरच यजमान संघ तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 ने बरोबरीत राहण्यात यशस्वी राहिला.

सामन्यानंतर धनंजय सिल्वाने म्हटले की संघात माझे काम हे सामन्याच्या शेवट पर्यंत टिकून राहणे आणि संघाला सामना जिंकून देण्याचे आहे. मला पहिल्या सामन्यात सांगण्यात आले होते परंतु मी याला करण्यात अयशस्वी राहिलो होतो. हा दिवस माझ्यासाठी होता आणि मी आपले काम केले. मला प्रशिक्षक, कर्णधार आणि निवडकर्ताद्वारा सांगण्यात आले की मला सामन्याच्या शेवट पर्यंत खेळायचे आहे यामुळे बाकीचे फलंदाज आपले खेळ खेळू शकतील आणि विरोधी संघावर आक्रमण करु शकतील आणि नंतर मी आपला स्ट्राइक रेट वाढवून संघाला विजय मिळवून देण्यास मदत करु शकेल.

29 वर्षीय सिल्वाने म्हटले की मला माहिती होते की खेळपट्टी मंद असेल आणि यामुळे विरोधी संघाला कमी धावसंख्येवर बाद केले जाऊ शकेल. आमची रणनीती होती की भारताला 125 ते 130 धावसंख्येवर रोखण्याचे आहे. आमच्या गोलंदाजानी चांगले केले आणि भारतीय संघातील फलंदाजांना धावा काढू दिल्या नाही. फलंदाजी करणे आमच्यासाठी सोपे असणार नाही हे आम्हांला माहिती होते परंतु आम्हांला माहिती होते की जर आम्ही 20 षटकां पर्यंत फलंदाजी केली तर आम्ही सामना जिंकू शकतोत.

दोनीही संघातील टि-20 मालिकेतील अंतिम सामना गुरुवारी खेळला जाणार आहे आणि दोनीही संघांपैकी जो कोणता हा सामना जिंकेल तो मालिका जिंकण्यात यशस्वी होईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!