राष्ट्रीय नेमबाजाजी स्पर्धेत जाणार्या रायफल शूटरवर काळाचा घाला; कार अपघातात मृत्यू
भोपाळ प्रतिनिधी
29 जुलै
मध्यप्रदेशमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार्या रायफल शूटरचा अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात एसयूव्ही कारने नियंत्रण गमाविल्याने धार शहराजवळ झाला आहे. नमन पालीवाल असे मृत रायफल शूटरचे नाव आहे. अपघातात दुसरी रायफल शूटर गंभीर जखमी आहे.
दोन्ही खेळाडू एसयूव्ही कारमधून इंदूरहून धारच्या दिशने येत होते. धारजवळ फोरलेनमध्ये कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. आदळल्यानंतर कारने पलटी घेतली. घटनास्थळीच रायफल शूटर नमन पालीवलचा मृत्यू झाला. कारमध्ये इतर महिला व पुरुष खेळाडूदेखील होते.
अपघाताची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी धार जिल्हा रुग्णालयातून रुग्णवाहिका पाठविण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला इंदूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही तरुण-तरुणी हे रायफल शूटर होते. ते राजस्थानमधील सीकर येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होते.
धार येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर रितेश पाटीदार म्हणाले, की नमन पालीवाल हे इंदूरमधील महिला खेळाडूसमवेत कारमधून जात होते. धारजवळ मोदी पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. घटनास्थळी नमन पालीवाल यांचा मृत्यू झाला. तर महिला खेळाडू गंभीर जखमी आहे. खेळाडूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अपघाताची पोलीस चौकशी करत आहेत.