भारतीय चाहत्यांना मोठा धक्का! मेरी कोम बॉक्सिंगमध्ये पराभूत
टोकियो
29 जुलै
भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला 51 किलो वजनी गटात हार पत्करावी लागली आहे. या पराभवामुळे मेरी कोम टोकियो ऑॅलिम्पिकमधून बाहेर पडलीय. आजच्या या पराभवामुळे तमाम भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. मेरी कोमकडून सर्वांना पदकाची अपेक्षा होती. 16 व्या फेरीत मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इगि-ट लोरेना वॅलेन्सियाशी झावला. यात मेरी कोम 2-3 अशा फरकाने पराभूत झाली.
टोकियो ऑॅलिम्पिकमधील मेरी कोमचा प्रवास आता थांबला आहे. प्री-क्वार्टर फायनलमध्ये सहा वेळा विश्वविजेती राहिलेल्या मेरी कोमला कोलंबियाच्या खेळाडूकडून 2-3 असा पराभवाचा सामना करावा लागला.
टोकियो ऑॅलिम्पिकमधील महिला फ्लायवेट 51 किलोग-ाम वजनी गटात 16 व्या फेरीच्या सामन्यात सहा वेळा विश्वविजेतेपद मिळवणारी भारतीय बॉक्सर एमसी मेरी कॉम कोलंबियाच्या इंग-ीट लोरेना वॅलेन्सियाकडून पराभूत झाली. भारताकडून पदकाची प्रबळ दावेदार मानल्या जाणार्या मेरी कोमला सामन्यात वॅलेन्सियाने 3-2 ने पराभूत केले.
प्री-क्वार्टर फायनल सामन्यात मेरी कोमच्या पराभवामुळे भारताच्या पदकांच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. वॅलेन्सिया तिच्या कामगिरीने तीन परीक्षकांना प्रभावित करण्यात यशस्वी झाली, तर मेरी कोमने केवळ दोन परीक्षकांना प्रभावित केले.
टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये आज सातव्या दिवशी झालेल्या 51 किलो वजनी गटातील 16 व्या फेरीच्या सामन्यात भारतीय महिला बॉक्सर एमसी मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इंग-ीट लोरेना वॅलेन्सियाशी झाला. या सामन्याच्या पहिल्या फेरीत मेरी कोमचा 1-4 असा पराभव झाला. पण दुसर्?या फेरीत मेरी कोमने 3-2 असा विजय नोंदवून नेत्रदीपक पुनरागमन केले.
पहिल्या फेरीत मेरी कोम बचावात्मक दिसली, तर दुसर्?या फेरीत तिने आक्रमक खेळ दाखविला. मात्र, मेरी कोमला तिसर्?या फेरीत 2-3 असा पराभव पत्करावा लागला. यासह बॉक्सिंगमधील भारताच्या पदकांच्या आशा देखील संपुष्टात आल्या.