बॉक्सर सतीश कुमारची क्वार्टर फायनल्समध्ये एन्ट्री; पदकापासून एक पाऊल दूर

टोकियो

29 जुलै

टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये भारताच्या सातव्या दिवसाची सुरुवात दिमाखदार झाली. भारताच्या चार धुरंधरांनी पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. हॉकी, बॅडमिंटन, तीरंदाजीपाठोपाठ आता बॉक्सिंमध्येही भारतानं बाजी मारली आहे. भारताचा स्टार बॉक्सर सतीश कुमारनं 91 किलो वजनी गटाच्या शेवटच्या सामन्यात जमैकाच्या रिकार्डो ब-ाउनचा 4-1 अशा फरकानं पराभव केला आहे. या विजयासह सतीश कुमार क्वार्टर फायनल्समध्ये दाखल झाला आहे.

आजच्या विजयासह सतीशनं अंतिम 8 मध्ये प्रवेश केला आहे. पदकापासून सतीश केवळ एक पाऊल दूर आहे. सतीशनं जमैकाच्या बॉक्सर विरोधात धमाकेदार खेळी करत क्वार्टर फायनल्समध्ये स्थान पक्कं केलं. आपल्या दमदार पंचेसच्या जोरावर 5-0 अशा फरकानं पहिला राउंड सतीशनं आपल्या नावे केला. या राउंडमध्ये पाचही पंचांनी सतीशला 10-10 अंक दिले.

दुसर्‍या आणि तिसर्‍या राउंडमध्ये सतीशची बाजी

दुसर्‍या आणि तिसर्‍या राउंडमध्येही सतीश कुमारनं रिकार्डो ब-ाउनवर दबाब कायम ठेवला. या सामन्यात रिकार्डोला वापसी करण्याची एकही संधी सतीशनं दिली नाही. सतीशनं दुसरा राउंड 4-1 च्या फरकानं जिंकला. तर तिसरा राउंडही सतीशनं4-1 या फरकानं जिंकला. आता सतीश 91 किलो वजनी गटात पदक जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.

पीव्ही सिंधूची डेन्मार्कच्या मियावर मात, क्वार्टर फायनल्समध्ये मिळवलं स्थान

बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूकडून भारतीयांना पदकाच्या अपेक्षा आहेत. सिंधूनं आज टोकियो ऑॅलिम्पिकमधील आपला सलग तिसरा सामना जिंकला आहे. डेन्मार्कच्या मियाचा पराभव करत सिंधूनं क्वार्टर फायनल्समध्ये स्थान मिळवलं आहे. सिंधूनं राउंड ऑॅफ 16 च्या सामन्यात सिंधूनं डेन्मार्कच्या मियाचा एकतर्फी परभाव करत विजय मिळवला. पीव्ही सिंधूनं 21-15 आणि 21-13 अशा फरकानं राउंड ऑॅफ 16चा सामना आपल्या खिशात घातला आहे. पीव्ही सिंधूनं क्वॉर्टर फायन्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे.

पीव्ही सिंधू ऑॅलिम्पिकमध्ये आपली उत्तम कामगिरी करताना दिसून येत आहे. राउंड ऑॅफ 16च्या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं डेन्मार्कच्या मिया विरोधातील पहिला गेम जिंकला. पीव्ही सिंधूनं पहिला गेम 21-15 नं आपल्या नावे केला. अशातच दुसरा सामनाही सिंधूनं 21-13 अशा फरकानं जिंकत सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात सिंधूनं मिया ब्लिचफेल्टचा सहज पराभव केला. सिंधूनं दोन सेटमध्येच मियाचं आव्हान संपुष्टात आणलं. सिंधूचा हा टोकियो ऑॅलिम्पिकमधील सलग तिसरा विजय आहे. या विजयासह सिंधूनं पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे.

टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये भारतीय तीरंदाज अतनू दासनं पुरुष एकेरी प्री-क्वार्टर्समध्ये धडक दिली आहे. अतनू दासनं दोन वेळचा ऑॅलिम्पिक चॅम्पियन कोरियन तीरंदाजाला मात देत विजय मिळवला आहे. दोघांमध्ये अटीतटीची लढत रंगल्याचं पाहायला मिळालं. या सामन्यादरम्यान अतून दासची पत्नी आणि भारताची महिला तीरंदाज दीपिका कुमारी सतत अतूनला प्रोत्साहन देताना दिसली.

यापूर्वी अतनू दासनं राउंड ऑॅफ 32 चा सामनाही शूट ऑॅफमध्ये खिशात घातला होता. त्यानं राउंड ऑॅफ 32 मध्ये चिनी ताइपेचया तीरंदाज डेंग यू चेंग कोको 6-4 नं मात दिली. या सामन्यात जिंकल्यानंतर अतनू समोर कोरियन तीरंदाजाचं मोठं आव्हान होतं. जे अतनूनं दिमाखात पार केलं.

भारतीय पुरुष हॉकी संघानं अर्जेंर्टीनावर मात करत 3-1 अशा फरकानं विजय मिळवला आहे. भारतानं अर्जेंर्टीनासारख्या मजबूत संघाला पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाकडून विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतानं ऑॅस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या फॉर्मात आहे.

टोकियो ऑॅलिम्पिक मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानं धमाकेदार विजय मिळवला आहे. भारतीय संघानं आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर रियो ऑॅलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट असलेल्या अर्जेंर्टीनाला 3-1 अशा फरकानं पराभूत केलं. अर्जेंर्टीनाचा पराभव केल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ आपल्या ग-ुपमधील टॉप 2 संघांमध्ये सहभागी झाला आहे. ग-ुप स्टेजवर शेवटचा सामना जपानसोबत 30 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!