दीपिका कुमारी पदकापासून एक पाऊल दूर

टोकियो

28 जुलै

भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिका कुमारीची टोकियो ऑॅलिम्पिक स्पर्धेच्या महिला एकेरीत शानदार कामगिरी कायम आहे. तिने अंतिम 8 मध्ये प्रवेश केला आहे.

दीपिकाने राउंड ऑॅफ 32 च्या सामना सहज जिंकला. दीपिकाने भूटानच्या कर्माचा 6-0 असा सहज पराभव करत राउंड ऑॅफ 16 मध्ये प्रवेश केला होता. दीपिकाने नवख्या भूटानच्या कर्मावर संपूर्ण वर्चस्व राखले. तिने कर्माला एकही सेट जिंकू दिला नाही.

राउंड 16 मध्ये दीपिकाचा सामना अमेरिकेच्या जेनिफर फर्नाडेज हिच्याशी झाला. या सामन्यातील पहिला सेट दीपिकाने गमावला. त्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये शानदार वापसी करत बरोबरी साधली. अखेरीस दीपिकाने हा सामना 6-4 असा जिंकत अंतिम 8 मध्ये प्रवेश केला.

तिरंदाजीत दीपिका, अतनुकडून पदकाच्या आशा –

आज सकाळी तिरंदाजीत तिसरा ऑॅलिम्पिक खेळत असलेला 37 वर्षीय तरुणदीप राय याचा इज-ाइलचा खेळाडू इताय शैनी याने शूट ऑॅफमध्ये पराभव केला. यानंतर महाराष्ट्राचा तिरंदाज प्रविण जाधवचे आव्हान अंतिम 16 मध्ये संपुष्टात आले. आता भारताची मदार दीपिका कुमारी आणि अतनु दास यांच्यावर आहे. दीपिका आणि अतनु यांच्याकडून पदकाची आशा आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!