पीव्ही सिंधूची प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक

टोकियो

28 जुलै

भारताची स्टार बॅडमिन्टन खेळाडू पीव्ही सिंधूचे उत्तम प्रदर्शन टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळत आहे. पीव्ही सिंधूने आणखी एक विजय मिळवत प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक दिली आहे. सिंधूने हाँगकाँगच्या खेळाडूला सरळ सेटमध्ये 21-9, 21-16 ने पराभूत केले. पदकाच्या दिशेने सिंधूने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

टोकियो ऑलिम्पिकची सुरुवातच पी. व्ही. सिंधूने विजयाने केली होती. त्यानंतर तिचा दुसरा सामना हाँगकाँगच्या च्युंग एनगान सोबत होता. या सामन्यात सिंधूने तिचा सहज पराभव केला. सिंधूने दोन सेटमध्येच च्युंग एनगानचा पराभव केला. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील दुसरा विजय आहे. या विजयासह सिंधूने नॉकआउट स्टेजमध्ये प्रवेश केला आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच हाँगकाँगच्या च्युंग एनगानवर दबाव बनवून सिंधू खेळत होती. सिंधू या सामन्यात काहीशी आक्रमक खेळी करताना दिसून आली. पहिल्या सेटमध्ये सिंधूने हाँगकाँगच्या च्युंग एनगानचा 21-9 अशा फरकाने पराभव केला. खरतर पहिल्या सेटमध्येच सिंधूने सामना आपल्या खिशात घातला होता. त्यानंतर दुसर्‍या सेटमध्येही पीव्ही सिंधूने 21-16 अशा फरकाने हाँगकाँगच्या च्युंग एनगानचा पराभव केला. अशातच 21-9, 21-16 अशा सरळ सेटमध्ये सिंधूने हाँगकाँगच्या च्युंग एनगानला पराभूत केले. या विजयासोबतच सिंधूने आपले आणखी एक पाऊल पदकाच्या दिशेने पुढे टाकले आहे. देशाला सिंधूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

भारतीय महिला हॉकी संघाचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिले आहे. आज सलग तिसर्‍यांदा भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव झाला आहे. भारतीय महिला संघाला आजच्या सामन्यात ग-ेट बि-टनने 4-1 अशी मात दिली. याआधीच्या सामन्यात जर्मनीने भारतीय महिला संघाचा 2-0 असा पराभव केला होता. भारतीय महिला हॉकी टीम आपले सलग तीन सामने गमावल्यामुळे ऑलिम्पिकमध्ये आता काही अपेक्षा उरलेल्या नाहीत. पहिला सामना नेदरलँडविरुद्ध 5-1 ने गमावला होता. तर दुसर्‍या सामन्यात जर्मनी विरुद्ध 2-0 ने भारतीय महिला हॉकी टीमचा पराभव झाला होता. भारतीय महिला संघाला तीन सामन्यात आतापर्यंत केवळ दोनच गोल करता आले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!