मराठमोळा तिरंदाज प्रविण जाधव हरला; पण लढला

टोकियो

28 जुलै

भारताचा मराठमोळा तिरंदाज प्रविण जाधवने पुरूष तिरंदाजी स्पर्धेच्या एकेरी गटात रशियाच्या गलसान बझारझापोव्हला धक्का दिला. गलसान जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर आहे. प्रविणने अशा मातब्बर खेळाडूला पराभूत केल्याने भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या. परंतु, राउंड 16 च्या फेरीत प्रविणला पराभव पत्कारावा लागला.

प्रविण जाधवने गलसानला पराभूत करण्याची किमया पात्रता फेरीमध्ये साधली. त्याने गलसानचा 6-0 ने एकतर्फा पराभव केला. पदकापर्यंत पोहचण्यासाठी त्याला किमान दोन विजय आवश्यक होते. मात्र अंतिम सोळा जणांच्या फेरीत प्रविणचा अमेरिकेच्या तिरंदाजाने पराभव केला आणि त्याचे वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

अंतिम 16 फेरीत अमेरिकेच्या ब-ॅडी एलिसन याने प्रविणला पराभवाचा धक्का दिला. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ब-ॅडी एलिसनने सामना 6-0 ने सहज खिशात घातला.

प्रविण जाधव सातारा जिल्ह्यातल्या सरडे गावाचा रहिवाशी आहे. त्याची आई-वडिल रोजंदारीवर काम करून घर चालवतात. अशा स्थितीत तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत प्रविणने टोकियो ऑॅलिम्पिकचा कोटा मिळवला आहे. नेदरलँडमध्ये 2019 साली पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत, भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने, सांघिक गटात धडाकेबाज कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली होती. या संघात प्रविण जाधव देखील होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!