टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसरा टी20 सामना पुढे ढकलला, क्रुणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली प्रतिनिधी
27 जुलै
भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळवण्यात येणार दुसरा टी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे. क्रुणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्याने हा सामना स्थगित करण्यात आला आहे. तसेच भारत आणि श्रीलंकेच्या संघानी आयसोलेट केले आहे. बीसीसीआयनने टवीट करत याची माहिती दिली आहे.
सध्या दोन्ही संघाच्या खेळाडूंची आणि स्टाफची चाचणी सुरू आहे. आता हा सामना उद्या (28 जुलैला) होणार आहे. भारताने या अगोदरचा पहिला सामना जिंकला आहे. परंतु आता मालिकेवर कोरोनाचे संकट आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या टी20 सामन्यात भारताने श्रीलंकेला 38 धावांनी हरविले होते.
बीसीसीआय आपल्या टवीटमध्ये म्हणाली की, क्रुणाल पांड्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणारा दुसरा टी20 सामना स्थगित करण्यात आला आहे. सध्या दोन्ही संघातील खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी सुरू आहे. क्रुणाल पांड्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकल टीमने त्याच्या संपर्कात आलेल्या 8 जणांना आयसोलेट केले आहे. अद्याप त्यांचा अहवाल आलेला नाही.
टी20 सीरीजच्या वेळापत्रकात बदल
बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून माहिती दिली आहे की, भारत आणि श्रीलंके दरम्यान दुसरा टी20 सामना 28 जुलै आणि तिसरा टी20 सामना 29 जुलैला खेळवण्यात येणार आहे.