भारतीय बॉक्सर लवलिना बोर्गोहेन पदकापासून दोन पाऊल दूर
टोकियो
27 जुलै
टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष बॉक्सरांनी निराश केलं. परंतु, महिला बॉक्सरांनी विजयी प्रारंभ केला. मेरी कोमनंतर आता लवलिना बोर्गोहेन याने पहिला सामना जिंकला आहे. लवलिनाने राउंड ऑॅफ 16 च्या सामन्यात जर्मनीच्या नेदिन अपेत्झचा 3-2 ने पराभव केला. विशेष म्हणजे लवलिनाने अनुभवी अपेत्झचा पराभव करत ऑॅलिम्पिकमध्ये सुरूवात केली.
उपांत्यपूर्व फेरीत भारतीय लवलिनाचा सामना चीनच्या चेन नेन हिच्याशी होणार आहे. चीनच्या खेळाडूने राउंड ऑॅफ 16 च्या फेरीत इटलीच्या खेळाडूचा बॉक्सरचा पराभव केलेला आहे. दरम्यान, 2018 च्या जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चेनने लवलिनाला पराभूत केलं होतं. या पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी भारतीय लवलिनाकडे आहे.
लवलिना अंतिम 8 मध्ये पोहोचली आहे. तिला पदक जिंकण्यासाठी आणखी दोन सामने जिंकावी लागणार आहेत.
लवलिना बोर्गोहेन ही 24 वर्षाची असून ती आसामची राहिवाशी आहे. सरुपथर विधानसभा मतदारसंघात येणार्या 2 हजार लोकांची वस्ती असलेल्या बरोमुखिया गावात लव्हलिना राहते. तिने दोन वेळा जागतिक चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकलं आहे. ऑॅलिम्पिकसाठी ती पहिल्याच पात्र ठरली आहे. ती 69 किलो ग-ाम वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
ऑॅलिम्पिक बॉक्सिंग इव्हेंटमध्ये भारतीय बॉक्सरकडून खूप आशा होत्या. परंतु पुरुष बॉक्सरनी सुमार कामगिरी केली. आता महिला बॉक्सरकडून देशाला पदकाच्या आशा आहेत. मेरी कोम नंतर आता लवलिनाकडून देखील पदकाची आशा व्यक्त केली जात आहे.