हार्दिक पांड्याने गायलं श्रीलंकेचं राष्ट्रगीत, व्हिडिओ व्हायरल

कोलंबो 26 जुलै

भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौर्‍यात चांगले प्रदर्शन सुरू आहे. एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने टी-20 मालिकेत विजयी आरंभ केला. रविवारी पार पडलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 38 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

दरम्यान, उभय संघातील या सामन्याला सुरूवात होण्याआधी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने असे कृत्य केले की, ज्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हार्दिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामना सुरू होण्याआधी दोन्ही देशाचे राष्ट्रगीत झाले. यादरम्यान, हार्दिक पांड्या श्रीलंका देशाचे राष्ट्रगीत गाताना पाहायला मिळाला. हार्दिकच्या या कृत्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

श्रीलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारताने सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 5 बाद 164 धावा केल्या. सुर्यकुमार याच्याशिवाय कर्णधार शिखर धवन याने 46 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेच्या संघाला भारताचे आव्हान पेलावले नाही. त्यांचा संघ 18.3 षटकात 126 धावांवर सर्वबाद झाला. भुवनेश्वर कुमारने 22 धावांत 4 गडी बाद करत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. त्याला दीपक चहरने 2 गडी बाद करत मोलाची साथ दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!