मानल राव! 13 वर्षीय मुलीने ऑॅलिम्पिकमध्ये जिंकलं सुवर्ण पदक
टोकियो
26 जुलै
टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये चौथ्या दिवशी 13 वर्षीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. एकाच खेळात दोन 13 वर्षीय खेळाडूंनी वर्चस्व राखलं. खेळ होता स्केट बोर्डिंगचा. यात जपानच्या निशिया मोमीजीने सुवर्ण पदक तर ब-ाझीलच्या रायसा लील हिने रौप्य पदक जिंकले. आश्चर्याची बाब म्हणजे दोघीही 13 वर्षाच्या आहेत.
महिला स्केट बोर्डिंग इव्हेंट मध्ये कांस्य पदकावर जपानने कब्जा केला. हे पदक 18 वर्षीय फुना नाकायामा हिने जिंकलं. विशेष म्हणजे, या तिनही खेळाडूंचे पहिलं ऑॅलिम्पिक आहे. या तिन्ही खेळाडूंनी कमी वयात पदक जिंकत आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केलं.
स्टेक बोर्डिंग इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर निशायाच्या डोळ्यात आश्रू आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, आश्रू येणं साहजिक आहे. कारण इतक्या कमी वयात निशायाने मिळवलं हे यश मोठं आहे. पहिल्याच ऑॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे ही बाब नक्कीच छोटी नाही.