मिशन फत्ते करून मीराबाई चानू भारताकडे रवाना

टोकियो

26 जुलै

ज्या मिशनसह मीराबाई चानू टोकियोला पोहोचली होती. ते मिशन दुसर्‍याच दिवशी पूर्ण झालं. यामुळे मीराबाई चानू चौथ्या दिवशीचं भारताकडे निघाली आहे. 26 वर्षीय मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलोग-ाम वजनी गटात भारताला रौप्य पदक जिंकून दिलं आहे.

भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने घर वापसीची माहिती दिली. तिने या संदर्भात टिवट केल असून यात तिने, आपल्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय आठवणींसह घरी परतत आहे, असे म्हटलं आहे. यासोबत मीराबाई चानूने, सर्वांचे आभार देखील मानले आहेत.

202 किलो वजन उचलत जिंकलं रौप्य पदक –

मीराबाई चानूने महिला 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत रौप्य पदकाला गवसणी घातली. तिने स्नॅच राउंडमध्ये 87 तर क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलले. चीनची वेटलिफ्टरने या प्रकारात 210 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले. तर इंडोनेशियाची वेटलिफ्टर 194 किलो वजनासह तिसर्‍या क्रमाकावर राहिली. तिला कांस्य पदक मिळाले.

वेटलिंफ्टिमध्ये पदक जिंकणारी मीराबाई चानू दुसरी भारतीय

ऑॅलिम्पिकमध्ये वेटलिंफ्टिगमध्ये पदक जिंकणारी मीराबाई चानू दुसरी भारतीय ठरली. याआधी 2000 सिडनी ऑॅलिम्पिकमध्ये कर्नम मल्लेश्वरीने 69 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले होते. या प्रकारात मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकत भारताचा 21 वर्षांचा दुष्काळ संपवला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!