फॉर्मला परत मिळविण्यासाठी प्रशिक्षक व जयंत यादव बरोबर काम केले – चहल

कोलंबो

26जुलै

क्रिकेटमधील आपल्या फॉर्मला माघारी मिळविण्यासाठी प्रशिक्षक आणि जयंत यादव बरोबर काम केले होते असे मत भारतीय क्रिकेट संघातील लेग फिरकी युजवेंद्र चहलने व्यक्त केले.

भारत व श्रीलंका संघात रविवारी खेळण्यात आलेल्या पहिल्या टि-20 सामन्यात भारतीय संघातील लेग फिरकी युजवेंद्र चहलने संघाच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली आणि संघातील आपली जागा कायम ठेवण्यात यश मिळविले.

भारताचा 31 वर्षीय चहलने सामन्यात चार षटकांमध्ये 19 धावा देऊन एक गडी बाद केला आणि श्रीलंकाई डावाला मधल्या षटकात धावा काढण्या पासून राखेल. मात्र मागील काही सामन्यात तो आपल्या सर्वश्रेष्ठ फॉर्ममध्ये नव्हता.

चहलने सामन्यानंतर मीडियाशी बोलताना म्हटले की माझे काम मधल्या षटकांमध्ये खेळाला नियंत्रीत करण्याचे आहे आणि मी खूप आनंदी आहे की मी असे केले आहे. मी खेळाला मधल्या षटकांमध्ये नियंत्रीत केले आणि अधिक प्रयत्न करण्या बाबत विचार केला नाही.

चहलने म्हटले की संघात अन्य फिरकी गोलंदाज पुढे येत असले तरी मला कोणतीही चिंता नाही कारण भारताने टि-20 विश्व कपसाठी संघाची निवड केली आहे.

भारतीय संघ श्रीलंका दौर्‍यावर सहा फिरकी गोलंदाजाना घेऊन गेला आहे आणि यापैकी एक गोलंदाज वरुण चक्रवर्तीने रविवारी खेळण्यात आलेल्या टि-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

चहलने पुढे म्हटले की जर बेंच स्ट्रेंथ इतकी चांगली आहे आणि आपल्याकडे एक मजबूत खेळाडूंचा पूल आहे ज्यातून गुणवत्ता येत आहे. जर आपण स्पिनर बाबत बोलूत तर ते सर्वजण चांगले करत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या मागे असे खेळाडू आहेत जे या आधी पासूनच आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन करत आहेत.

त्याने म्हटले की माझे लक्ष आपल्या प्रदर्शनावर आहे आणि ज्यावेळी खेळतो तर मला प्रदर्शन केले पाहिजे. जर आपण प्रदर्शन करतोत तर त्याचवेळी आपण खेळतोत. जर आपण प्रदर्शन करत नसूत तर मग कोणीही असू तो संघात राहू शकत नाही. यामुळे मी जास्त विचार करत नाही. माझे जे लक्ष्य आहे त्यावर मी लक्ष केंद्रित करतो आहे.

चहलने म्हटले की लॉकडाऊनमध्ये मी प्रशिक्षका बरोबर चर्चा केली. मला जास्त लक्ष केंद्रित करण्याची जरुरी नव्हती आणि मला फक्त लाईनवर लक्ष देणे होते. यामुळे मी भरत अरुण बरोबर चर्चा केली आणि पारस म्हाब-े बरोबर बोलणे केल्यानंतर मी स्वत:वर विश्वास करु शकलो

चहलने म्हटले की मी जयंत यादव बरोबर सराव केला, आम्ही दोघेही एकमेकांना लहानपणा पासून ओळखत आहोत. यामुळे मी त्याच्याशी बोलणे केले. मी त्याला गोलंदाजी केली आणि त्यावेळे पासून माझ्यासाठी गोष्टी सोप्या होणे सुरु झाल्या. मला वाटते की मी माझ्या गोलंदाजीवर जेवढा विश्वास करेल तितके माझ्यासाठी चांगले होईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!