श्रीलंकेचा पहिला डाव 275 वर ओटोपला, भुवनेश्वर आणि चहलचे प्रत्येकी 3 बळी
नवी दिल्ली प्रतिनिधी
20 जुलै
भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसर्या वन डे सामन्याला सुरुवात झाली आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाने 9 गडी गमावत 50 षटकांमध्ये 275 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी भारतासमोर 276 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेमधील पहिला सामना भारताने जिंकला होता.
श्रीलंकन संघाच्या डावाची सुरुवात थोडीशी डळमळीत झाली. 41 षटकांमध्ये 6 गडी गमावून श्रीलंका संघाची धावसंख्या 205 वर पोहोचली आहे. अविष्का फर्नांडो याने 71 चेंडूत 50 धावा काढल्या. मिनोद भानुका याने 36, धनंजय डिसिल्वा 32,वनायंडू हसरंगा 8, तर दसून शानाका याने 16 धावा काढल्या. चरित अस्लन्का याने 65 धावांची दमदार खेळी केली. चमिका करुनरत्ने यानेही चिवटपणे खेळत नाबाद 44 धावा बनवल्या. दुशमंता चमिरा याने 2 धावा केल्या.
युजवेंद्र चहलने 3 गडी बाद केले तर भुवनेश्वर कुमारनेही 3 गडी तंबूत परतवले. दीपक चहरने 2 गडी बाद केले.