कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान खेळणार एकाच गटात
दुबई
16 जुलै
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) शुक्रवारी ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे पुरुषांच्या टी20 विश्वचषक 2021 स्पर्धेतील टीमच्या गटांची घोषणा केली आहे. यात विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. दोघेही सुपर-12च्या ग-ुप गट-2 मध्ये आहेत. यात शोपीस इव्हेंटच्या गटातील टप्प्यात या दोन्ही संघांची टक्कर होईल.
ओमानमध्ये झालेल्या आयसीच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली. यावेळी बीसीसी अध्यक्ष अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनीही भाग घेतला. टी-20 वर्ल्डकपचे सामन्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
20 मार्च 2020 रोजी असलेली टीम रँकिंगच्या आधारावर ग-ुपची निवड करण्यात आली असून गत विजेता वेस्ट इंडिजचा संघ सुपर 12 च्या पहिल्या गटात गत उपविजेता इंग्लँड, ऑॅस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या संघासोबत निवडण्यात आलाय. राऊंड 1 मधील दोन पात्रता गटात त्यांचा समावेश आहे.
आयसीसी पुरूष टी -20 विश्वचषक 2021 या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर 12 फेरी गाठतील. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे.
ग-ुप ए मध्ये आयर्लंड, नेदरलँड आणि नामिबिया यांचा श्रीलंकासोबत समावेश आहे, तर ग-ुप ’बी’ मध्ये ओमान, पीएनजी आणि स्कॉटलंडचा सामना बांगलादेशशी होईल.
2016 नंतर होणारा हा पहिलाच टी-20 विश्वचषक आहे. 3 एप्रिल 2016 रोजी वेस्ट इंडिज आणि इंग्लँड यांच्या अंतिम सामना झाला होता. वेस्ट इंडिजने 4 गडी राखून हा सामना जिंकून टी-20 चे दुसर्यांदा विश्वविजेतेपद मिळवले होते.