भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा भिडणार, सुपर-12मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ

मुंबई प्रतिनिधी

16 जुलै

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा सर्वांसाठी केवळ सामना आणि मैदानापुरता उरत नाही तर देशप्रेमापर्यंत जातो. क्रिकेटप्रेमींसाठी आता एक मोठी बातमी येत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा एकदा मैदानात भिडणार आहेत. टी 20 वर्ल्ड कपसाठीचे ग-ूप आयसीसीने जाहीर केले आहेत. या ग-ूपमध्ये सुपर 12मध्ये भारत आणि पाकिस्तान संघाला एकाच ग-ूपमध्ये ठेवण्यात आलं आहे.

आयसीसीने टी -20 वर्ल्ड कपच्या ग-ूपची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानला एकाच ग-ूपमध्ये स्थान देण्यात आलं आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजला दुसर्?या गटात स्थान देण्यात आलं आहे. या स्पर्धेचे सामने 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ळअए आणि ओमान इथे होणार आहेत. एकूण 16 संघ टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहेत.

टी 20 वर्ल्डकप सुपर 12मध्ये दोन गटांत कोणते संघ

ग्रुप 1: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रीका, वेस्टइंडीज, ए1, बी2

ग्रुप 2: भारत, पाकिस्तान, न्यूजीलैंड, अफगानिस्तान, बी1, ए2

क्वालिफायर स्टेजमध्ये 8 संघांची 2 ग-ृपमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. सुपर 12 मधील 2 ग-ृपमध्ये सध्या 8 संघांचाच समावेश आहे. क्वालिफायर स्टेजमध्ये दोन्ही ग-ृपमधून प्रत्येकी 2 संघ सुपर 12 मध्ये स्थान मिळवण्साठी प्रयत्न करतील. त्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल.

ग्रुप अ: श्रीलंका, आयरलंड, नीदरलंड, नामबिया

ग्रुप ब: बांग्लादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमान

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी पुरूष टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे ओमानला जागतिक क्रिकेटच्या कक्षेत आणणे चांगले. आयसीसी पुरूष टी -20 विश्वचषक 2021 चे स्थान दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियम, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदान. स्पर्धेचे वेळापत्रक निश्चितपणे जाहीर केलं जाणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!