रोमांचक सामन्यात ऑस्ट्रलियाचा विंडीजवर विजय

सेंट लुसिया

मिशेल मार्श (75) आणि कर्णधार आरोन फिंच (53) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने डेरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळण्यात आलेल्या चौथ्या टि-20 सामन्यात वेस्टइंडिजला चार धावाने हरविले. या सामन्यातील पराभवानंतरही विंडीज पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत मार्शच्या 44 चेंडूत चार चौकार व सहा षटकारांच्या मदतीने 75 धावा तसेच फिंचच्या 37 चेंडूत पाच चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 53 धावांच्या जोरावर 20 षटकांमध्ये सहा बाद 189 धावसंख्या केली.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विंडीजचा संघ लेंडल सिमंसच्या 48 चेंडूत 10 चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 72 धावा केल्यानंतरही वीस षटकांमध्ये सहा बाद 185 धावा करु शकला. ऑस्ट्रेलियाकडून मार्शने तीन, अ‍ॅडम जम्पाने दोन आणि रिली मेरेडिथने एक गडी बाद केला.

लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजकडून एविन लुइसने 31, फेबियन अ‍ॅलेनने 29 आणि निकोलस पूरनने 16 धावांचे योगदान दिले  तर आंद्रे रसेल 24 धावा काढून नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाकडून मार्श आणि फिंच व्यतिरीक्त डेनियल क्रिस्टियनने 22 व मिशेल स्टार्क आठ काढून नाबाद राहिला. विंडीजकडून हेडन वॉल्शने तीन, तर ओशाने थॉमस, रसेल आणि अ‍ॅलोनने प्रत्येकी एक गडी बाद केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!