वसीम जाफर ओडिशा क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी
नवी दिल्ली प्रतिनिधी
15जुलै
भारतीय क्रिकेट संघातील माजी फलंदाज वसीम जाफरला दोन वर्षासाठी ओडिशा क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.
क्रिकबजच्या बातमीनुसार जाफर हे रशिम परीदांची जागा घेणार असून परीदा हे मागील दोन वर्षा पासून मुख्य प्रशिक्षकपदावर काम करत होते. जाफरने मार्च 2020 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर उत्तराखंड संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले होते. या व्यतिरीक्त त्याने आयपीएलमधील संघ किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज प्रशिक्षक पदाच्या रुपात काम केले आहे.
ओडिशा क्रिकेट संघाचे सचिव संजय बेहरानी म्हटले की सर्व वयोगाटात क्रिकेटच्या विकासा व्यतिरीक्त जाफर राज्यातील प्रशिक्षण विकास योजनेचा हिस्सा असेल.
जाफरने मुंबई आणि विदर्भासाठी 186 प्रथम श्रेणी सामने खेळले असून यात त्याने 146096 धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर रणजी ट्रॉफीमध्ये 156 सामन्यात 12038 धावा असून त्याने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला आहे.
भारतातील घरगुती हंगाम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी पासून 20 ऑक्टोंबर पासून सुरु होईल. रणजी ट्रॉफी 16 नोव्हेंबर 2021 ते 19 फेब-ुवारी 2022 पर्यंत आयोजीत केली जाईल. यानंतर 23 फेब-ुवारी 2022 पासून विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन होईल.