बर्मिघम एकदिवशीय : इंग्लंडने पाकिस्तानला हरवून 3-0 ने मालिका जिंकली
बर्मिघम प्रतिनिधी
14जुलै
जेम्स विंस (102) चे शतक आणि लुईस ग-ेगोरी (77) च्या उत्कृष्ट अर्धशतक व ब-ाइडन कार्सेचे 61धावात पाच बळींच्या जोरावर इंग्लंडने येथील एजबस्टनमध्ये खेळण्यात आलेल्या तिसर्या एकदिवशीय सामन्यात पाकिस्तानला तीन गडी राखून पराभूत केले व तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली.
सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत कर्णधार बाबर आझमच्या 139 चेंडूत 14 चौकार व चार षटकारांच्या मदतीने 158 धावांच्या खेळीच्या जोरावर 50 षटकात नऊ बाद 331 धावसंख्या केली.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने विंसच्या 95 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 102 आणि ग-ेगोरीच्या 69 चेेंडूत सहा चौकार व तीन षटकरांच्या मदतीने 77 धांवाच्या जोरावर 48 षटकांत सात बाद 332 धावा करुन सामना जिंकला. विंंस व ग-ेगोरी व्यतिरीक्त जॅक क्रॉव्लीने 39, फिलिप साल्टने 37 आणि कर्णधार बेन स्टोक्सने 32 धावांचे योगदान दिले तर क्रॅग ओव्हरटॉन 18 आणि कार्से 12 धावा करुन नाबाद राहिले. पाकिस्तानकडून हॅरिस रोउफने चार, शादाब खानने दोन आणि हसन अलीने एक गडी बाद केला.
या आधी पाकिस्तानकडून बाबरने आपल्या करीअरमधील सर्वश्रेष्ठ डाव खेळला आणि संघाला मजबूत धावसंख्ये पर्यंत पोहचविले. त्याच्या व्यतिरीक्त मोहम्मद रिजवानने 58 चेंडूत आठ चौकारांच्या मदतीने 74 आणि सलामीचा इमाम उल हकने 73 चेंडूत सात चौकाराच्या मदतीने 56 धावा केल्या इंग्लंडकडून कार्सेने 5, साकिब महमूदनले तीन आणि मॅथ्यू पॉर्किसनने एक गडी बाद केला.