भारतीय हॉकी संघात अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत – दिलीप तिर्की
बेंगळूरु प्रतिनिधी
12जुलै
कर्णधार मनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघात अनेक उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश आहे असे मत भारताचा माजी डिफेंडर दिलीप तिर्कीने व्यक्त केले. दिलीपने 1996 अॅटलाँटा, 2000 सिडनी आणि 2004 अॅथेंस ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघात प्रतिनिधीत्व केले आहे.
दिलीपने म्हटले की मला वर्तमान भारतीय पुरुष हॉकी संघाकडून खूप आशा आहेत. मला वाटते की संघात अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे टोकियोमध्ये पदक जिंकण्याची चांगली संधी आहे. मी संंघाला आपल्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आशा करतो की ते या ऑलम्पिकमध्ये चांगले प्रदर्शन करतील.
अॅटलाँटातील आपल्या पहिल्या ऑलम्पिकमध्ये खेळण्याच्या अनुभवा बाबत दिलीपने म्हटले की सर्व अॅथलीटांचे ऑलम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न असते आणि मला 1996 मध्ये पहिल्यांदा ऑलम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली. आमच्याकडे संघात काही मोठे खेळाडू होते जसे की कर्णधार परगट सिंह. मी ऑलम्पिकमध्ये खेळण्यासाठी खूप उत्साहित होतो.
दिलीपने म्हटले की 2000 मध्ये सिडनी ऑलम्पिकमध्ये पोलँड विरुध्द 1-1 ने सामना अनिर्णीत राहिणे हे माझ्यासाठी व भारतीय संघासाठी सतत खेदजनक राहिले.
त्याने म्हटले की आम्ही त्या ऑलम्पिकमध्ये गटस्तरावर चांगले प्रदर्शन केले होते. आम्ही अर्जेटिना, स्पेन आणि ऑस्ट्रेलियाला विरुध्द चांगले खेळलो होतोत आणि आम्हांला उपात्य सामन्यात जाण्यासाठी पोलंडला हरविण्याची जरुरी होती परंतु आम्ही असे करु शकलो नाहीत. हे आमच्यासाठी खूप दुखद आठवणी आहेत.