आशिया कप : यूएई विरुध्दच्या सामन्याच्या आधी भारतीय फुटबॉल खेळाडूना प्रशिक्षकाडून विजयाचा मंत्र

दुबई,

आशिया फुटबॉल कपमध्ये यूएई विरुध्द होणार्‍या सामन्याच्या आधी भारताच्या अंडर-23 फुटबॉल संघातील खेळाडूंना बुधवारी राष्ट्रीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅकने विजयाचा मंत्र दिला आहे.

इगोर स्टिमॅकने खेळाडूना सांगितले की विनम- रहा आणि मोठे स्वप्न पहा. कारण त्यांनी स्पर्धेच्या सुरुवातीला ओमान सारख्या मोठया संघाला पराभूत केले आहे. ही काही लहान गोष्ट नाही.

अंडर-23 आशियाई कप प्रवेशपात्रतामध्ये भारतीय संघ आपला दुसरा सामना बुधवारी फुजैरामध्ये खेळणार आहे. यात यजमान यूएईला पराभूत करण्याची पूर्ण आशा आहे. यामुळे प्रशिक्षक स्टिमॅकने म्हटले की मी आपल्या खेळाडूना विनम- राहणे आणि मोठे स्वप्न पहाण्यास सांगितले आहे. कारण त्यांनी मागील सामन्यात ओमानच्या संघाला हरविले. ज्याची मला आशा नव्हती.

भारताचा बॅक फोर आणि गोलरक्षक धीरज सिंहच्या शानदार गोलच्या कारणामुळे ओमानवर 2-1 ने मोठा विजय मिळाला होता.

स्टिमॅकने बुधवारी सांगितले की आम्हांला जास्त सजह होण्याची गरज नाही. कारण संयुक्त अरब अमिरात (यूएई) तांंत्रीकपणे ओमानच्या तुलनेत चांगला संघ आहे. मला आशा आहे की ज्या प्रकारे आमच्या खेळाडूनी ओमानच्या विरोधात चांगले प्रदर्शन केले होते तेसच प्रदर्शन यूएई विरुध्दच्या सामन्यात ते करतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!