सामन्यात खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक; ’या’ खेळाडूंवर आयसीसी कडून कठोर कारवाई

दुबई,

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी (24 ऑॅक्टोबर) या स्पर्धेत बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दीक चकमक पाहायला मिळीली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंवर आयसीसीकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे.

रविवारी (24 ऑॅक्टोबर) बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात बांगलादेश संघाची फलंदाजी सुरू असताना 5 वे षटक टाकण्यासाठी लाहिरू कुमार गोलंदाजीला आला होता. या षटकात लाहिरू कुमारने लिटन दासला बाद करत माघारी धाडले होते.

लिटन दास बाद झाल्यानंतर लाहिरू कुमारने त्याला काहीतरी पुटपुटला. त्यानंतर लिटन दासने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर हे दोन्ही खेळाडू आमने सामने आले होते. प्रकरण इतके पुढे गेले होते की चक्क खेळाडूंनी एकमेकांना धक्का बुक्की केली होती. त्याचा व्हिडीओ काही सेकंदात सोशल मीडिवर व्हायरलदेखील झाला होता.

यानंतर आयसीसीने दोन्ही खेळाडूंवर कठोर कारवाई केली आहे. लाहिरू कुमारला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. जे अपमानास्पद भाषा, कृती किंवा हावभाव वापरण्याशी संबंधित आहे.

तर लिटन दासला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी संबंधित आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.20 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे, जे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध वागण्याशी संबंधित आहे.

बांगलादेश संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटक अखेर 4 बाद 171 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने 18.5 षटकात आव्हाने गाठले आणि बांगलादेश संघावर 5 गडी राखून विजय मिळवला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!