मध्य रेल्वेचा ’डंका’ टोकियो ऑॅलम्पिकमध्ये वाजणार

मुंबई प्रतिनिधी ,18 जून

tokyo olympics 2021 latest news updates japan doctor warns tokyo olympics  may spread rapidly coronavirus rkt | Tokyo Olympic 2021: टोक्या ओलंपिक कहीं  कोरोना का सुपर स्प्रेडर ना बन जाए? जापान के

कोरोना विषाणूमुळे वर्षभर लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑॅलिम्पिकचे आयोजन 23 जुलै 2021 ते 8 ऑॅगस्ट 2021 दरम्यान होणार आहे. या टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील चार खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे.

भारतीय रेल्वेने आजतागायत कला विश्वात अनेक कलाकार, क्रीडाविश्वात अनेक खेळाडू दिले आहे. अनेकांनी ऑॅलिम्पिक स्पर्धेत भारतचं नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. यंदाचा टोकियो ऑॅलिम्पिक 2021 मध्ये अनेक भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील चार खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे. मध्य रेल्वेसाठी ही बाब अभिमानास्पद आहे. कारण टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये खेळणार्‍या भारतीय महिला हॉकी संघातील 16 सदस्यांच्या संघात मध्य रेल्वेच्या 4 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

16 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघातील 13 खेळाडू भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तिकिट तपासणी संवर्गात काम करणारे चारही खेळाडू मोनिका मलिक हेड टीसी, वंदना कटारिया हेड टीसी, सुशिला चानू पुखरांबम् हेड टीसी आणि स्टँड-इन गोल कीपर रजीनी एतिमारपु हेड टीसी यांची भारतीय ऑॅलिम्पिक महिला हॉकी संघात निवड झाली आहे. या खेळाडू गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेकडून सराव आणि खेळत आहेत. यांच्या प्रशिक्षक हेलन मेरी (अर्जुन पुरस्कार प्राप्त) आणि सरिता ग्रोव्हर असून त्या मध्य रेल्वेत कार्यरत असून त्या राष्ट्रीय हॉकीपटू होत्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!