व्हायरल ; रोनाल्डो-कोका कोला वादावर फेविकॉलची हटके जाहिरात
मुंबई प्रतिनिधी ,18जून
क्रिस्टियानो रोनाल्डो आणि कोका-कोला वादाला फेविकॉलने एक वेगळा अँगल देऊन त्याचा वापर आपल्या जाहिरातीसाठी केला आहे. एक मजेदार जाहिरात तयार करण्यासाठी या वादाचा फेविकॉल ब्रँडने वापर केला आहे. ही जाहिरात फेविकॉलने टिवटरवर शेअर केली आहे.
आता सोशल मीडियावर ही जाहिरात खूप पसंत केली जात आहे. खरं तर, फेविकॉलच्या जाहिरातीमध्ये दोन अ्पेग्न बॉटल फोटोशॉप करुन प्रेस कॉन्फरन्स टेबलवर ठेवण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, जाहिरातीसह कॅप्शनमध्ये ‘ना बॉटल हलणाार, नाही मूल्यांकन घसरणार’ असे लिहिले आहे. तसेच, हाय नी मेरा कोका कोको कोका कोका लिहून त्यांनी कोका-कोला कंपनीला लक्ष केले आहे.
माहितीनुसार, स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोने नुकत्याच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये कोका कोलाच्या दोन बॉटल टेबलवरुन बाजूला ठेवत पाण्याची बोटल समोर ठेवली. या कृतीमुळे रोनाल्डोची पत्रकार परिषद संपण्याच्या अगोदर कोका कोलाचे शेअर त्र्56.10 वरुन त्र्55.22 पर्यंत खाली आले. कंपनीला यात सुमारे 400 कोटी रुपयांचा फटका बसला. या घटनेनंतर लोकांनी रोनाल्डोच्या कोका कोला स्नॅपवर मिम्स बनवण्यास सुरूवात केली. यात आता फेविकॉलचा समावेश झाला आहे.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर 21,000 पेक्षा जास्त ‘लाईक्स’ फेविकॉलची जाहिरात असलेल्या टिवटने मिळविल्या आहेत आणि लोक ब्रँडच्या मार्केटींग पध्दतीची प्रशंसा करीत आहेत. फेविकॉलच्या नवीन जाहिरातीचे नेटकरी कौतुक करीत आहेत. यावर उद्योगपती हर्ष गोएंका यांनी देखील भाष्य केले असून याचे वर्णन शानदार मार्केटींग असे केले आहे. त्याचवेळी, एका युझरने लिहिले आहे की फेविकॉलच्या जाहिराती 2 दशकांहून अधिक काळ सातत्याने नेत्रदीपक आहेत. खरं तर, फेविकॉलने आपल्या सर्जनशील जाहिरात मोहिमेद्वारे भारतीयांच्या अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले आहे.