भारताचा ऑलम्पिकसाठी महिला हॉकी संघ घोषित
बंगळुरु प्रतिनिधी
17 जून
हॉकी इंडियाने यावर्षी होणार्या टोकिओ ऑलम्पिकसाठी 16 सदस्यीय महिला हॉकी संघाची घोषणा केली. हॉकी इंडियाने सांगितले की या संघात तरूण आणि अनुभवी खेळांडूचा चांगला मेळ आहे आणि संघात आठ अनुभवी खेळांडूना जागा दिली आहे. ऑलम्पिकसाठी कर्णधाराची घोषणा नंतर केली जाईल.
आठ अनुभवी खेळांडुमध्ये रानी रामपाल, सविता, दीप ग्रेस एका, सुशीला चानू पुखरमबाम, मोनिका, निकी प्रधान, नवजोत कौर आणि वंदना कटारिया समाविष्ट आहे जे 2016 रियो ऑलम्पिक संघात देखील समाविष्ट होते.
मुख्य प्रशिक्षक शुअर्ड मरिने यांनी सांगितले या संघाने मागील काही वर्षामध्ये खुप मेहनत केली आणि सतत लय कायम ठेवला आहे. संघात अनुभवी आणि तरूण खेळांडूचा चांगला मेळ आहे जे चांगले आहे. आम्ही टोकिओमध्ये आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे.
महिला हॉकी संघाचे हे तिसरे ऑलम्पिक होईल. संघाने यापूर्वी 1980 मॉस्को आणि 2016 रियो ऑलम्पिकमध्ये भाग घेतला होता.
रियो ऑलम्पिकनंतर भारतीय संघाने 2016 अशिया चॅम्पियंस ट्रॉफी आणि 2017 अशिया चषक जिंकले होते जेव्हा की त्याने 2018 अशियन खेळांमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौर, उदिता, निशा, नेहा, नवनीत कौर, शर्मिला देवी आणि लालरेमसियामी ऑलम्पिकमध्ये डेब्यू करेल.
भारतीय महिला हॉकी संघ याप्रकारे: सविता (गोलकीपर), दीप ग्रेस एका, निकी प्रधान, गुरजीत कौर, उदिता (डिफेंडर्स), निशा, नेहा, सुशीला चानू पुखरमबाम, मोनिका, नवजोत कौर, सलिमा टेटे (मिडफील्डर्स),रानी रामपाल, नवनीत कौर, लालरेमसियामी, वंदना कटारिया आणि शर्मिला देवी