महामुकाबल्यावर पावसाचं सावट, खोडा घातल्यास कोणता संघ ठरणार विजेता?

मुंबई प्रतिनिधी

17 ऑगस्ट

शुक्रवार 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना रंगणार आहे. अजिंक्यपदासाठी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने भिडणार आहे. या सामन्याचे आयोजन 18-22 जूनदरम्यान साऊथम्पटनमध्ये करण्यात आले आहे. या सामन्यावर पाचही दिवस पावसाचं सावट आहे. स्थानिक हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला, तर सामना बेरंग होण्याची शक्यता आहे.

इंग्लंडमध्ये खेळताना हवामान महत्वाची भूमिका बजावतो. या महामुकाबल्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 18 जूनला हवामान विभागाने पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास सामन्याचा रंग बेरंग होऊ शकतो. 18 जूनला साऊथम्पटनधील तापमान 17 डिग्री इतके असणार आहे.

हवामान खात्यानुसार, साऊथम्पटनमध्ये 18 जूनला दिवसभरात जोरदार तसेच हलक्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे 90 षटकांचा अपेक्षित होण्याची शक्यता फारच कमी आहे. पण नक्की काय होणार, हे उद्याच समजेल.

पाऊस पहिल्या दिवसासह, दुसर्‍या, तिसर्‍या आणि पाचव्या दिवशी पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फक्त सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच 21 जूनला हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार, जर सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात येणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, अश्विन, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

अशी आहे न्यूझीलंडची टीम

केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे, कोलिन डि ग-ँडहोम, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलकर, नील वैगनर, बीजे वाटलिंग आणि विल यंग.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!