‘चूक’ सुधारत पाकिस्तानची नवी जर्सी लाँच
लाहोर,
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चूक सुधारत टी-टवेन्टी वर्ल्डकप संघाची नवी जर्सी लाँच केली आहे. आधीच्या जर्सीवर यूएईऐवजी लिहिले होते भारत असे लिहिले होते. यंदाचा टी-टवेन्टी वर्ल्डकप भारतात होत नसला, तरी बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करत आहे. कोरोना महामारीमुळे, बीसीसीआय आणि आयसीसीने परस्पर संमतीनंतर हे ठिकाण ओमान आणि यूएईला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसी स्पर्धेतील सर्व संघांना त्यांच्या जर्सीवर उजव्या बाजूला यजमान देशाचे नाव आणि वर्षासह स्पर्धेचे नाव लिहिणे अनिवार्य आहे. मात्र आता पाकिस्तानने भारताच्या नावासोबत वर्ल्डकपसाठी नवी जर्सी लाँच केली आहे.