अंतिममध्ये पोहचल्याने आम्ही आनंदी आहोत – मोर्गन

शारजाह,

आयपीएलमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिल्स विरुध्द खेळण्यात आलेल्या सामन्यातील अंतिम चार षटकामध्ये सात धावांवर चार गडी गमविल्यानंतर संघ विखुरला होता परंतु शेवटी विजय मिळविल्याने आणि अंतिम सामन्यात पोहचल्याने आम्ही आनंदी आहोत असे मत कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर) चा कर्णधार इयोन मोर्गने व्यक्त केले.

आयपीएल 2021 मध्ये बुधवारी शारजाहमध्ये कोलकाता नाइट राइडस (केकेआर) आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळण्यात आलेल्या रोमांचक सामन्यात केकेआरने तीन गडी राखून विजय मिळविला. अंतिम सामन्यत आता केकेआरचा सामना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुध्द होईल.

सामन्यानंतर मोर्गनने म्हटले की वेंकटेश अय्यर आणि शुभमन गिलच्या शानदार सुरुवातीनंतर आमच्यासाठी गोष्टी सोप्या       झाल्या होत्या परंतु शेवटी आम्ही अनेक गडी गमविल्याने आमच्यासाठी मार्ग कठिण झाला. आता मी आनंदी आहे की आम्ही अंतिममध्ये प्रवेश केला आहे.

त्याने म्हटले की आम्ही सहजपणे जिंकू शकलो असतोत परंतु दिल्ली संघ शानदार आहे. आम्हांला दोन चेंडूत सहा धावांची गरज होती आणि राहुल त्रिपाठीने खूप चांगल्यापणाने आपले काम केले. एखादा युवा खेळाडू संघाला पुढे नेतो आहे हे पाहून चांगले वाटले.

अय्यारने आयपीएलच्या दुसर्‍या फेरीत संघासाठी सतत शानदार प्रदर्शन केले आहे. त्याच्या बाबत मोर्गनने म्हटले की अय्यारला सलामीला पाठविणे प्रशिक्षकाचा निर्णय होता. तो एक शानदार प्रतिभा असलेला आहे आणि  त्याने आमच्यासाठी लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे बनविले. असे वाटत होते की तो एक वेगळ्या प्रकारची फलंदाजी करत होता. चेन्नईच्या विरोधात अंतिम सामन्यात आम्हांला वाटते की त्याने संघासाठी असेच योगदान द्यावे कारण चेन्नई शानदार संघ आहे आणि अंतिममध्ये काहीही होऊ शकते.

केकेआरला आता शुक्रवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर चेन्नई सुपर किंग्सच्या विरुध्द अंतिम सामना खेळायचा आहे.  2012 नंतर दोनी संघ अंंतिम सामन्यात पहिल्यांदाच आमने सामने असतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!