कोलकाता विरुद्ध पराभव झाल्यानंतर कॅप्टन रिषभ पंत आणि पृथ्वीला अश्रू अनावर

शारजा,

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील दुसरा क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. हा लो स्कोरिंग सामना रंगतदार झाला. शेवटच्या षटकापर्यंत ताणल्या गेलेल्या सामन्यामुळे दिल्लीच्या विजयाच्या आशा कायम होत्या. मात्र अखेर राहुल त्रिपाठीने सिक्स खेचत कोलकाताला विजय मिळवून दिला. यासह कोलकाताने आयपीएलच्या इतिहासात तिसर्‍यांदा धडक मारली. तर दिल्लीचं आव्हान संपुष्टात आलं.

या चुरशीच्या सामन्यात पराभव झाल्याने दिल्लीचा युवा कर्णधार रिषभ पंत (ठळीहरलह झरपीं) आणि सलामीवीर पृथ्वी शॉला (झीळींर्हींळ डहरु) अश्रू अनावर झाले. या दोघांचा भावूक झालेला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भावूक झालेल्याला पंतला रिकी पॉन्टिंगने धीर दिला. डगआऊटमध्ये पंत रडताना दिसला. त्याच्यासोबत पॉन्टिंग होता. यांचा फोटो व्हायरल होतोय. तर दुसर्‍या बाजूला पृथ्वीला मैदानातच रडू कोसळलं. सामन्यानंत जेव्हा पंत संवाद साधायला आला. तेव्हाही पंत काहीसा भावूक झालेला दिसून आला.

प्रत्येक कॅप्टनचं आपल्या नेतृत्वात टीमला लोकप्रिय स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न असतो. त्यानुसार दिल्लीने या मोसमाच्या सुरुवातीपासून तडाखेदार कामगिरी केली. दिल्लीचं गत मोसमातील विजेतेपदाचं स्वप्न अवघं एक पाऊल दूर राहिलं. हे स्वप्न पंत पूर्ण करेल, अशा विश्वास टीम मॅनेटमेंटला होता.

पंत तो विश्वास सार्थही ठरवत होता. मात्र अखेर क्वालिफायर 2 मध्ये दिल्लीचं स्वप्न भंगलं. ‘आम्ही पुढच्या वेळेस आणखी जोमाने परतू, असा विश्वास पंतने यावेळेस व्यक्त केला‘, असं पंतने नमूद केलं. दिल्लीला आपण जिंकवू शकलो नाही, ही खंत पंतच्या बोलण्यातून दिसून येत होती.

असा रंगला सामना

कोलकाताने टॉस जिंकला. दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शिखर धवनने 36 तर श्रेयस अय्यरने नाबाद 30 रन्स केल्या. इतर फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना 20 पेक्षा अधिक धावांचा पुढचा टप्पा गाठता आला नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!