पुरुष टि-20 विश्व कप 2021 च्या विजेत्यांना 16 लाख डॉलरची पुरस्कार रक्कम मिळणार

दुबई,

पुरुष टि-20 विश्व कप 2021 मधील विजेत्या संघाला 16 लाख डॉलरची पुरस्कार रक्कम मिळेल तर उपविजेत्याना याची अर्धी 8 लाख डॉलरची रक्कम मिळणार असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने रविवारी केली.

आयसीसीने म्हटले की स्पर्धेतील उपात्य सामन्यात पोहचणार्‍या अन्य दोन संघाना 4 लाख डॉलर मिळतील. टि-20 विश्व कप स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान संयुक्त अरब अमीरात आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे.

टि-20 विश्व कपमध्ये भाग घेणार्‍या सर्व 16 स्पर्धात्मक संघाना पुरस्कार रक्कमेच्या रुपात वाटप करण्यात येणार्‍या 5.6 दशलक्ष डॉलरचा हिस्सा मिळेल.

टि-20 विश्व कप 2016 सारखेच सुपर 12 फेरीतील एका संघाला प्रत्येक सामना जिंकल्याबद्दल एक बोनस रक्कम मिळेल. या फेरीत स्पर्धेतील 30 पैकी प्रत्येक सामना जिंकणार्‍या संघाला यावेळी 40 हजार डॉलर मिळतील असे एकूण बजट 12 कोटी डॉलर आहे.

सुपर 12 फेरीत स्पर्धा करणार्‍या संघामध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलँड, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका आणि वेस्टइंडिजचा समावेश आहे.

ज्या आठ संघात पुरुष टि-20 विश्व कप अभियान सुपर 12 फेरीमध्ये समाप्त होईल यांना स्वचालितपणे 70 हजार डॉलर मिळतील जे एकूण 5,60,000 डॉलर असतील.

पहिल्या फेरीत बाहेर गेलेल्या चार संघाना प्रत्येकी 40 हजार डॉलर मिळतील. ज्या संघाचे अभियान पहिल्या फेरीत सुरु होतील यामध्ये बांगलादेश, आयरलँड, नामिबिया, नेदरलँड, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि श्रीलंकेचा समावेश आहे.

आयसीसीने म्हटले की पुरुषांच्या टि-20 विश्व कपच्या प्रत्येक सामन्यात दोन निर्धारित ड्रिंग्स ब-ेक असतील आणि हे ब-ेक 2 मिनिट 30 सेंकेदाचा असेल. हा ब-ेक प्रत्येक डावाच्य्या मध्यमध्ये घेतला जाईल. निर्णय समीक्षा प्रणाली (डीआरएस) चा उपयोग पहिल्यांदाच पुरुषांच्या टि-20 विश्व कपमध्ये केला जाईल. प्रत्येक संघाला सामन्यात अधिकतम दोन डीआरएस मिळतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!