सलामीला खेळण्यास ज्यावेळी सांगीतले जाईल मी तयार आहे – ईशान
अबू धाबी
मला ज्यावेळी डावाची सुरुवात करण्यास सांगितले जाईल तर मी कधीही यासाठी तयार आहे असे मत मुंबई इंडियंसचा युवा फलंदाज ईशान किशनने व्यक्त केले.
ईशानने म्हटले की भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून मिळालेल्या प्रेरणामुळे मला शीर्ष क्रमावर फलंदाजी करण्यात सोपे होत गेले.
ईशानने शुक्रवारी आयपीएल 2021 च्या सामन्यात सनराइजर्स हैद्राबादच्या विरोधात 32 चेंडूत 84 धावा केल्या आणि संघाला 235 धावांच्या मजबूत धावसंख्ये पर्यंत पोहचण्यात महत्वाचे योगदान दिले.
हैद्राबादच्या विरोधात मिळालेला विजय मात्र मुंबई संघाला प्लेऑफ पर्यंत पोहचू शकला नाही आणि नेट रन रेटच्या आधारावर मुंबईचा आयपीएलमधील प्रवास गट साखळी सामन्यातच समाप्त झाला.
सलामीच्या भूमिके बाबत ईशानने म्हटले की मी एका वेळी एकच पॉइाटवर लक्ष देत राहिलो होतो. मला सलामीला खेळणे पंसत आहे आणि हे कोहलीनेही म्हटले होते. त्याने म्हटले होते की तू सलामीचा फलंदाज म्हणून निवडला गेला आहे तू यासाठी तयार राहावे.
त्याने म्हटले की धावा करणे माझ्या आणि संघासाठी चांगले आहे. मी विश्व कपच्या आधी चांगला टच देऊ इच्छित होतो. मी सकारात्मक होतो आणि आमचे लक्ष्य 250-260 धावाचे होते.