पाकिस्तान टीममध्ये 3 बदल, भारताची डोकेदुखी वाढणार?

मुंबई,

संपूर्ण क्रिकेट विश्व सध्या आयपीएल स्पर्धेत मग्न आहे. आयपीएल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून आठवभरात या सिझनचा विजेता कोण हे स्पष्ट होणार आहे. त्याचवेळी टी20 वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन देखील सुरू झालं आहे. पाकिस्ताननं या वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीममध्ये 3 बदल केले आहेत. टीममध्ये बदल करण्यासाठी आयसीसीनं दिलेली मुदत संपत आलेली असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ही घोषणा केली आहे.

पाकिस्तानच्या 15 सदस्यीय टीममध्ये माजी कॅप्टन सर्फराज अहमद ओपनर फखर जमां आणि हैदर अली यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी निवडण्यात आलेल्या टीममधील आझम खान आणि फास्ट बॉलर मोहम्मद हसनैन यांना वगळण्यात आले असून खुशदील शाहचा आता राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी पाकिस्तान टीमच्या निवडीवर जोरदार टीका झाली होती. या टीमची निवड झाल्यानंतर काही तासांमध्येच हेड कोच मिसबाह उल हक आणि बॉलिंग कोच वकार युनूस यांनी राजीनामा दिला होता. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही या निवडीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पाकिस्तान बोर्डानं हे बदल केले आहेत. आयसीसीनं सर्व टीमनं बदल करण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे.

पाकिस्तानची या वर्ल्ड कपमधील पहिली लढत 24 ऑक्टोबरला भारताविरुद्ध होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला हरवणार्‍या टीमचा सर्फराज कॅप्टन होता. तर फखर जमांनं त्या मॅचमध्ये शतक झळकावले होते. भारताला या स्पर्धेत हरवल्यास खेळाडूंना बक्षीस देण्यासाठी कोरा चेक तयार असल्याची घोषणा पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी केली आहे.

पाकिस्तानची टीम : बाबर आझम (कप्तान), शादाब खान (उप-कप्तान), आसिफ अली, फखर जमां, हैदर अली, हॅरीस रऊफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद (विकेटकीपर) ), शाहीन शाह अफरीदी, सोहेब मकसूद.

राखीव खेळाडू : खुशदिल शाह, शाहनवाज दहानी और उस्मान कादीर

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!