बॅटसमन ऐवजी बॅटर्स, आयसीसीचा नवा नियम लागू

नवी दिल्ली,

आयसीसीने गुरुवारी पुढच्या महिन्यापासून सुरु होत असलेल्या टी 20 विश्वकप स्पर्धेपासून बॅटसमन ऐवजी बॅटर्स शब्द वापरण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. क्रिकेट हा सर्वांसाठी आणि सर्वांचा खेळ म्हणून मान्यता पावावा आणि त्यातील जेंडर दर्शविणारे जे शब्द आहेत त्याऐवजी जेंडर न्युट्रल शब्दांचा वापर वाढावा, जेणे करून महिला आणि मुलीना क्रिकेट खेळण्यास अधिक प्रोत्साहन मिळेल असा त्यामागे विचार आहे. सप्टेंबर मध्येच मेरीलीबोन क्रिकेट क्लब म्हणजे एमसीसी ने सर्व फलंदाजांसाठी बॅटर्स शब्द वापरायची सुरवात केली होती त्याला आता आयसीसी कडून अनुकूल प्रतिसाद मिळाला आहे.

गेली चार वर्षे कॉमेंट्री, ब-ॉडकास्टर्स बॅटर्स शब्दाचा वापर करत आहेत. या संदर्भात आयसीसीचे सीईओ जेफ एलार्डीस म्हणाले, एमसीसीने खेळ नियमात बदल करून बॅटर्स शब्द वापरण्याचा जो निर्णय घेतला त्याचे स्वागत आहे. हा बदल म्हटले तर छोटा आहे पण त्याचा क्रिकेटवर अभूतपूर्व परिणाम होणार आहे. आता क्रिकेट कडे खास खेळ म्हणून पहिले जाईल. एमसीसीने लैंगिक भेद संपविण्याचा प्रयत्न यातून केला आहे. बोलर्स, फिल्डर शब्द जेंडर न्युट्रल आहेतच. त्यामुळे त्यात बदलाची गरज नाही. पण जे शब्द जेंडर न्युट्रल नाहीत ते बदलण्याच्या विचार नक्की केला जाईल. असे शब्द बदलण्याची हि योग्य वेळ आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!