म्हणून सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन अपयशी ठरतायेत, दिग्गजाने सांगितलं कारण
यूएई,
मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेतील आतापर्यंतची यशस्वी टीम आहे. मात्र या 14 व्या मोसमात पलटणने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे मुंबईचं प्लेऑफमधील आव्हान हे जर तरवर आहे. या पर्वात मुंबईच्या फलंदाजांनी प्रामुख्याने ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी निराशा केली. या युवा खेळाडूंनी श्रीलंका दौर्यात उल्लेखनीय फलंदाजी केली. त्यामुळे या दोघांची टी 20 वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली.
आयपीएलकडे टी 20 वर्ल्ड कपसाठीची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जातंय. यामध्ये हे दोन्ही फलंदाज अपयशी ठरले. यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून या दोघांना वर्ल्ड कपमधून बाहेर करा, अशी मागणी केली जात आहे. या दोन्ही फलंदाजांच्या कामगिरीबाबाबत टीम इंडियाचे माजी कर्णधार लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हे दोघेही आयपीएलमध्ये अपयशी का ठरले, याचंही कारण त्यांनी सांगितलंय.
गावसकर काय म्हणाले?
ठमला वाटतं सूर्यकुमार आणि ईशान हे दोघेही कॅप खेळाडू (आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण) झाल्यापासून रिलॅक्स झाले आहेत. असं असेलच असं नाही, मात्र त्यांचे फटके पाहून तरी असंच वाटतंय. हे दोघे टीम इंडियामध्ये असल्यामुळेच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायेत. क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्ही स्वत:ला वेळ द्यायचा असतो. तसेच अचूक शॉट सिलेक्शन करायचं असतं. यामध्ये हे दोघे चुकले. त्यामुळे ते स्वसतात आऊट झाले‘, असं गावसकरांनी स्पष्ट केलं. ते स्टार स्पोटर्सच्या ’क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
हार्दिक पंड्याबाबत काय म्हणाले?
ठगावसकरांनी टीम इंडियाचा स्टार फलंदाज हार्दिक पंड्याबाबतही मत मांडलं. हार्दिकने बॉलिंग न करणं हे फक्त मुंबईसाठी नाही, तर टीम इंडियासाठीही तोट्याचं आहे. हा मोठा झटका आहे, कारण हार्दिकचा संघात अष्टपैलू म्हणून समावेश करण्यात आला आहे. जर तुम्ही 6 व्या किवा 7 व्या क्रमांकावर बॅटिंग करताय आणि बॉलिंग करु शकत नाहीत, तर हे कर्णधारासाठी अडचणीचं ठरतं‘, असंही गावसकरांनी नमूद केलं.