धोनीने पराभवानंतर ही समोरच्या संघातील खेळाडूला दिलं हे खास गिफ्ट

दुबई,

आयपीएलच्या 47 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा 7 गडी राखून पराभव केला आणि 2 महत्त्वाचे गुण मिळवले. राजस्थानचा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने 19 चेंडूंत शानदार अर्धशतक झळकावून राजस्थानला सहज विजय मिळवून दिला.

राजस्थान रॉयल्सच्या 19 वर्षीय यशस्वी जयस्वालने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 21 चेंडूत 50 धावांची धमाकेदार खेळी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. जयस्वालने 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या डावात 6 चौकार आणि 3 षटकार मारले. सामना संपल्यानंतर जयस्वालला चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून भेटही मिळाली. धोनीने जयस्वालच्या बॅटवर त्याचा ऑॅटोग-ाफ दिला. त्यानंतर जयस्वाल खूप आनंदी दिसत होता.

ऑॅटोग-ाफ मिळाल्यानंतर यशस्वी जयस्वाल यांनी आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, मला माही सरांकडून ऑॅटोग-ाफ मिळाला, मी खूप आनंदी आहे. त्याच्या फलंदाजीबाबत जयस्वाल म्हणाला, ’मला माहित होते की ही विकेट फलंदाजीसाठी चांगली असेल, मला वाटले की मला वाईट चेंडूंचा फायदा घ्यावा लागेल तरच मी संघाला चांगली सुरुवात देऊ शकतो आणि संघ जिंकू शकतो. म्हणूनच आम्ही सामना जिंकला.’

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ॠतुराज गायकवाडच्या शानदार शतकामुळे चेन्नईने राजस्थानसमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले. ॠतुराजने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. प्रत्युत्तरात राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि एविन लुईस यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. जयस्वाल आणि शिवम दुबे यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने चेन्नईचा 7 गडी राखून पराभव केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!