महिला क्रिकेट : मंधानाचे शतक, पावसाचा अडथळा
गोल्ड कोस्ट,
सलामीची फलंदाज स्मृति मंधानाच्या 127 धावांच्या शानदार शतकीय डावाच्या जोरावर भारतीय महिला संघाने येथील कारारा ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात खेळण्यात येत असलेल्या एकमेव दिवस-रात्रीच्या कसोटी सामन्यात पावसामुळे खेळ थांबे पर्यंत पहिल्या डावात पाच बाद 276 धावा केल्या.
भारत व ऑस्ट्रेलियात खेळण्यात येत असलेल्या एकमेव दिवस-रात्र कसोटी सामन्यातील दुसर्या दिवसचा खेळ समाप्त झाला त्यावेळी भारताने पाच बाद 276 धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा दीप्ति शर्मा 28 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 12 आणि यष्टीरक्षक-फलंदाज तानिया भाटिया 13 चेंडूत शून्यावर नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियाकडून सोफी मोलिनेयूक्सने दोन तर अॅलिसे पेरी आणि अॅे गार्डनरने प्रत्येकी एक गडी बाद केला आहे.
या आधी भारतीय महिला संघाने पहिल्या दिवसाच्या एक बाद 132 धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि मंधाना 80 आणि पूनम राउतने 16 धावांवरुन पुढे खेळत दोनीही फलंदाजानी शानदार सुरुवात केली. मंधनाने आपले शतक पूर्ण केले याच बरोबर मंधाना ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत शतक करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज बनली आहे.
मंधाना आणि पूनमने दुसर्या गडयासाठी 102 धावा केल्या. मात्र मंधानाला काही वेळानंतर गार्डनरने बाद केले. तिने 216 चेंडूत 22 चौकार व एक षटकाराच्या मदतीने 127 धावा केल्या यानंतर मोलिनेयूक्सने पूनमला बाद करुन भारताला तिसरा धक्का दिला. पूनमने 165 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 36 धावा केल्या.
यानंतर कर्णधार मिताली राजने यस्तिका भाटिया बरोबर मिळून डावाला पुढे नेले परंतु पेरीने यास्तिकाला बाद केले. तिने 40 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 19 धावा केल्या. यानंतर काही वेळानंतर मितालीही धावबाद झाली. तिने 86 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या.
भारतीय डावातील 102 व्या षटकाच्या दरम्यान खराब हवामानाच्या कारणामुळे सामन्याला थांबवावे लागले. सामना परत सुरु होण्याच्या स्थितीत नसल्याने चहापण्याची घोषणा केली गेली. यानंतरही स्थिती मात्र सुधारली नाही आणि सामन्यातील तिसर्या सत्राचा खेळीही होऊ शकला नाही आणि वेळेच्या आधीच दिवसाचा खेळ समाप्त करावा लागला.
दोनीही संघातील तिसर्या दिवसाचा खेळ 108 षटकांचा होईल. सामन्याच्या पहिल्या दिवशीही पावसाने व्यत्यय आणला होता मात्र बातमीनुसार पुढील दोन दिवस पावसाचा पुर्वअंदाज नाही.