पिंक बॉल कसोटी : स्मृती मंधानाचे पहिले कसोटी शतक; भारताची मजबूत स्थितीकडे वाटचाल
गोल्ड कोस्ट
पिंक बॉल कसोटीतील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या भारत विरूद्ध ऑॅस्ट्रेलिया दिवसरात्र कसोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने शानदार शतक झळकावित भारताला मजबूत स्थितीत पोहोचविले आहे. स्मृतीने सामन्यात शानदार 127 धावांची खेळी साकारली आहे.
स्मृतीने 216 चेंडूंचा सामना करताना 58.79 च्या स्ट्राईक रेटने 127 धावांचे योगदान संघाच्या धावफलकात दिले. स्मृतीने या धडाकेबाज खेळीत एकूण 22 चौकार आणि 1 षटकार मारला. अॅशले गार्डनरच्या चेंडूवर ताहलिया मॅकग-ाथकडून स्मृती झेलबाद झाली. स्मृतीचे हे पहिलेच कसोटी शतक आहे. या शतकी खेळीत तिला पूनम राऊत आणि शेफाली वर्मा या दोघींनी चांगली साथ दिली. पूनमने 36 तर शेफालीने 31 धावांचे योगदान दिले.
सध्या भारताकडून कर्णधार मिताली राज 15 तर यस्तिका भाटिया 2 धावांवर खेळत आहे. दुसर्या दिवशी 84 षटकानंतर भारतीय संघाच्या 3 बाद 231 धावा झाल्या आहेत.