महिला क्रमवारीता : झूलन एकदिवशीय क्रमवारीतेमध्ये दुसर्या स्थानी
दुबई,
भारताची गोलंदाज झूलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने प्रसिध्द केलेल्या महिलांच्या एकदिवशीय क्रमवारीतेमध्ये गोलंदाजांच्या यादीत दुसर्या स्थानी पोहचली आहे. ऑस्ट्रेलियांची यष्टीरक्षक-फलंदाज अॅलिसा हेली फलंदाजांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे तर पहिल्या स्थानी असलेली लिजेले लीपेक्षा ती फक्त 11 रेटिंग अंकाने मागे आहे. बेथ मूनी आठव्या स्थानावर घसरली आहे.
झुलने ऑस्ट्रेलिया विरुध्द खेळण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत चार गडी बाद केले होते. मात्र भारत ही मालिका 1-2 ने हरला.
गोलंदाजी क्रमंवारीतेमध्ये इंग्लंडची अन्या श्रुबसोले आणि कॅटी क्रगॉस पहिल्यां दहामध्ये पोहचल्या असून त्या अनुक्रमे 9 व्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.
श्रुबसोलेने न्यूझीलँडच्या विरुध्द शेवटच्या दोन एकदिवशीय सामन्यात तीन गडी बाद केले. या आधी तिने क्रमवारीतेमध्ये चार स्थानाचा सुधार केला. कॅटीने पाचव्या एकदिवशीय सामन्यात 44 धावा देऊन तीन गडी बाद केले यामुळे तिने पाच स्थानाने झेप घेतली.
अष्टपैलू क्रमवारीतेमध्ये अॅे गार्डनर सहाव्या तर अॅलिसे पेरी दोन स्थानाने घसरुन तिसर्यावर आली आहे. दक्षिण अफ्रिकेची मरिजाने काप पहिल्या स्थानावर आहे. झूलन अष्टपैलू क्रमवारीतेमध्ये तीन स्थानांच्या सुधारासह पहिल्या दहामध्ये पोहचली.