मुंबई उपनगर येथील जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन

मुंबई,

आंतरराष्ट्रीय व ऑॅलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतीभावंत खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रिडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटित प्रयत्न करणे, क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. याकरीता क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनी पुणे येथील प्रवेशाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय चाचणी दि. 5 ऑॅक्टोबर रोजी डायव्हिंग, वय 8 ते 12 वर्ष आतील (फक्त मुले) (दि.01.01.2022 रोजी वय 8 ते 12 असणे आवश्यक राहील); ?थलेटिक्स-वय 10 ते 14 वर्ष आतील (फक्त मुले) (दि. 01.01.2022 रोजी वय 10 ते 14 असणे आवश्यक राहील) ; बॉक्सिंग- वय 10 ते 14 वर्ष आतील (फक्त मुले) (दि. 01.01.2022 रोजी वय 10 ते 14 असणे आवश्यक राहील) ; कुस्ती- वय 10 ते 14 वर्ष आतील (फक्त मुले) (दि. 01.01.2022 रोजी वय 10 ते 14 असणे आवश्यक राहील) ; तलवारबाजी- वय 10 ते 14 वर्ष आतील (फक्त मुले) (दि. 01.01.2022 रोजी वय 10 ते 14 असणे आवश्यक राहील) ; वेटलिफ्टिंग- वय 10 ते 14 वर्ष आतील (फक्त मुले) (दि. 01.01.2022 रोजी वय 10 ते 14 असणे आवश्यक राहील) या सर्व चाचण्या- भारतीय खेळ प्राधिकरण, आकुर्ली रोड, कांदिवली येथे होणार असून सर्व चाचण्यांची वेळ सकाळी 8.00 वा. असणार आहे.

शाळाक्लबखाजगी क्रीडा संस्थामधील सराव करत असणार्‍या उद्?योन्मुख खेळाडूंना या खेळनिहाय क्रीडा नैपुण्य चाचण्यांमध्ये सहभाग घेता घेईल. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता योग्य त्या खबरदारीसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. सहभाग घेऊ इच्छिणार्‍या खेळाडूंची नावे, शाळेचेक्रीडा संस्थेचे नाव, घरचा पत्ता, जन्म तारीख, इयत्ता आणि संपर्क क्रमांक आदी संपूर्ण माहिती आधारकार्ड प्रतीसह जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर या कार्यालयास र्वीेाीालरर्ळीील2020ऽसारळश्र.लेा या मेल आयडीवर दि. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मेल करण्यात यावा, असे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!