टीम दबावात असताना धोनी अशी मदत करतो, ॠतुराज गायकवाडकडून ’कॅप्टन कूल’चं कौतुक

अबुधाबी

चेन्नईकडून खेळणारा मराठमोळा सलामीवीर ॠतुराज गायकवाड सातत्याने धमाकेदार खेळी करतोय. कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात ॠतुराजने 40 धावांची खेळी केली. तसेच फॅफ डु प्लेसिससोबत 73 धावांची सलामी भागीदारी करत चेन्नईला चांगली सुरुवात मिळवून दिली. चेन्नईने कोलकाताचा शेवटच्या चेंडूवर एक धाव काढत थरारक विजय मिळवला. यासह चेन्नईने पॉइंटसटेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं.

ॠतुराजने ’कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीचं कौतुक केलंय. धोनीच्या शांत स्वभावाचा टीमला कशाप्रकारे फायदा होतो, याबाबतचं रहस्य ॠतुराजने उलगडून सांगितलंय.

ॠतुराज काय म्हणाला?

ठजेव्हा आम्ही विजयी आव्हानाचं पाठलाग करतो तेव्हा सलामी जोडीकडून चांगल्या सुरुवाचीती अपेक्षा असते. सलामी जोडीचं मैदानात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं. जर मी किंवा फॅफ डु प्लेसीसपैकी कोणीही 13 व्या ओव्हरपर्यंत मैदानात राहिलो असतो, तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला नसता‘,असं ॠतुराजने स्पष्ट केलं.

ठसंघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत, ज्यांना दबावात्मक स्थितीवर नियंत्रण कसं मिळवायचं हे त्यांना माहिती आहे. धोनी फार शांत स्वभावाचा आहे. टीममध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दबावात खेळण्याचा अनुभव आहे. दबावाच्या क्षणी हे सर्व खेळाडू शांत असतात. त्यांना माहिती असतं की आपण सामना जिंकू‘, असंही ॠतुराजने नमूद केलं.

…म्हणून धोनीला ’कॅप्टन कूल’ म्हणतात

याआधीही धोनीच्या शांत स्वभावाचा प्रत्यय क्रिकेट चाहत्यांना आला आहे. अगदी हातातून निसटलेला सामना धोनी माईंड गेमने आपल्या बाजूने फिरवतो. धोनी दबावात खेळाडूंवर आरडाओरडा करत नाही किंवा संतापतही नाही. खेळाडूंना समजावून सांगतो. त्यांना विश्वासात घेतो.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!