शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, म्हणतो, भारत आमच्या……..

मुंबई,

न्यूझीलंड क्रिकेट संघ या महिन्यात 18 वर्षानंतर पाकिस्तान दौर्‍यावर गेला होता. मात्र न्यूझीलंडने या दौर्‍याच्या सुरुवातीआधीच सुरक्षेच्या कारणांमुळे हा दौरा रद्द केला. न्यूझीलंड टीमला पाकिस्तानात धोका असल्याचं माहिती सरकारकडून मिळाली होती. यानंतर दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड या दौर्‍यात 3 वनडे, 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार होती. मात्र वनडे सीरिजमधील पहिल्या मॅचआधीच न्यूझीलंडने हा दौरा रद्द केला.

हा दौरा रद्द झाल्याने पाकिस्तानचा तीळपापड झालाय. पाकिस्तानचे आजी माजी खेळाडू हे भारतावर टीका करत असतात. यावेळेस पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे.

शाहिद आफ्रिदी काय म्हणाला?

शाहिद आफ्रिदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत संवाद साधत होता. आफ्रिदीला या संवादादरम्यान खेळाडूंना करण्यात आलेल्या मेलवरुन प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावरुन त्याने गरळ ओकली आहे. ‘खेळाडूंना जो मेल पाठवण्यात आला होता तो भारतातून करण्यात आला होता, कारण काश्मिर प्रीमयर लीगमुळे त्यांच्या भावना दुखावल्या होत्या, म्हणून हा वचपा काढलाय का?‘, असा प्रश्न आफ्रिदीला विचारण्यात आला.

ठआम्हाला जगाला सांगायचंय की आम्ही पण एक देश आहोत आणि यासाठी आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील. आम्हाला ही काही मान सन्मान आहे. एक देश आमच्या मागे लागला आहे. पण इतर देशांनी ती चूक करायला नको, जी चूक हा देश करतोय. सर्व राष्ट्र हे सुशिक्षित आहेत. त्यांनी भारतासारखं करायला नको‘, असं उत्तर आफ्रिदीने विचारलेल्या प्रश्नावर दिलं.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणि खेळाडूंनी क्रिकेटपटूंनी त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी समजूत घातली होती, जेणेकरुन पाकिस्तानात पुन्हा क्रिकेटला सुरुवात होईल. यानंतर पुन्हा एकदा नव्याने पाकिस्तानात क्रिकेटला सुरुवात झाली. दहशतवाद्यांच्या विरुद्ध हा आमचा मोठा विजय होता. सर्वांनी आपली भूमिका चोखपणे बजावली होती. कोणताही क्रिकेट दौरा सूरक्षेचे निकष पूर्ण झाल्याशिवाय होत नाही‘, असंही आफ्रिदी म्हणाला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!