प्ले ऑॅफच्या शर्यतीतून हा संघ बाहेर, भावुक होत कोच म्हणाले…
दुबई,
आयपीएलचा थरार पुन्हा एकदा सुरु झाला आहे. आयपीएलचा हा दुसरा टप्पा सध्या यूएईमध्ये खेळवला जात आहे. आतापर्यंत 8 पैकी 7 टीम्स या स्पर्धेत प्लेऑॅफच्या शर्यतीत आहेत. मात्र सनरायझर्स हैदराबाद ही एकमेव टीम जेतेपदाच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर झाली आहे. या मोसमात हैदराबादची कामगिरी सर्वात वाईट राहिली आहे. याबाबत आता हैदराबादच्या कोचने यावर मोठं विधान केलं आहे.
आयपीएलच्या सध्याच्या सीझनमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात संपूर्ण टीमची फलंदाजी अपयशी ठरली. त्यामुळे संघाची खराब कामगिरी झाली आहे, असं सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांचं मत आहे. हैदराबादचा संघ नऊ सामन्यांमधून केवळ एका सामन्यात विजय मिळवला आहे. पॉईंटस टेबलमध्ये हैद्राबादचा संघ अगदी तळाला आहे. कालच्या सामन्यात देखील पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यातही संघाला 5 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.
बेलिस पुढे म्हणाले, ‘भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही हे फार चिंताजनक आहे. जेव्हा आम्ही चांगली कामगिरी केली होती, तेव्हा आमच्या परदेशी खेळाडूंनी आम्हाला चांगली सुरुवात दिली होती. मात्र, हैदराबाद संघ प्ले-ऑॅफच्या शर्यतीतून बाहेर आहे.‘
’आमच्या मिडल ऑॅर्डरमध्ये युवा खेळाडू होते. पण आज मला वाटतं की आमचा मिडल ऑॅर्डर अनुभवी होता आणि त्या खेळाडूंनी चुका केल्या. आम्हाला यापेक्षा चांगले खेळावं लागेल आणि पुढच्या वेळी पुनरागमन लागेल, असंही बेसिल म्हणाले.