कॅप्टन कोहलीला टी 20 क्रिकेटमध्ये ’विराट’ कारनामा करण्याची संधी, मुंबईची पलटण रोखणार का?

यूएई,

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसर्‍या टप्प्याचा खेळ सुरु झालाय. शनिवार 25 सप्टेंबरपासून डबल हेडर सामन्यांना सुरुवात झाली. रविवारी आज (26 सप्टेंबर) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यात खेळवण्यात येत आहे. तर यानंतर आरसीबी विरुद्ध मुंबई यांच्यात हायव्होलटेज सामना पार पडणार आहे.

मुंबई आणि बंगळुरु या दोन्ही संघांचा दुसर्‍या टप्प्यातील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना प्लेऑॅफच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघांसाठी अटीतटीचा सामना असणार आहे. सामना जिंकण्यासह प्लेऑॅफमधील आव्हान कायम ठेवण्याचं लक्ष्यही दोन्ही संघांसमोर असणार आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला अनोखा कारनामा करण्याची संधी आहे.

विराट हा विक्रम करणार की पलटण रोखणार?

विराटला टी 20 क्रिकेटमध्ये एकूण मिळून 13 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याची संधी आहे. विराटला यासाठी फक्त 13 धावांची गरज आहे. ताज्या आकडेवारीनुसार विराटच्या नावे एकूण 313 सामन्यात 9 हजार 987 धावा आहेत. विराटने ही कामगिरी केली, तर तो अशी कामगिरी करणारा एकूण 5 वा तर पहिला भारतीय ठरेल.

आतापर्यंत एकूण 4 जणांनी टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये अनुक्रमे ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेव्हिड वॉर्नरचा समावशे आहे.

कर्णधारपदाची ’कसोटी’

विराट कोहली आयपीएलनंतर बंगळुरुची आणि टी 20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाची कॅप्टन्सी सोडणार आहे. विराटनंतर टी 20 क्रिकेटमध्ये नियमांनुसार रोहित शर्माकडे कर्णधारपदाची सूत्र सोपावण्यात येतील.

त्यामुळे कर्णधार म्हणून विराट की रोहित, उत्तम कोण हे सिद्ध करणारा हा सामना असणार आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी विराट आणि रोहित दोघेही जोर लावतील. तसेच दोघांच्या नेतृत्वगृणांचा आणि आतापर्यंतच्या अनुभवाचा कस लागणार आहे. त्यामुळे आजची मॅच कोणती टीम जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!