चेन्नई गुणतालिकेत अव्वल, तिसर्या स्थानी असूनही विराटच्या ठउइच्या अडचणी वाढल्या
नवी दिल्ली
इंडियन प्रिमियर लीग च्या 14 व्या सिझनमध्ये काल शुक्रवारी धोनीच्या सीएसकेनं विराटच्या आरसीबीचा पराभव करत गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. शारजा येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2021 च्या 35 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेटसने पराभव केला. बेंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने 11 चेंडू राखत 4 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग पूर्ण केला. चेन्नईचा या मोसमात 9 सामन्यांमधील सातवा विजय आहे. यासह चेन्नईनं पॉइंट टेबलमध्ये 14 गुणांसह पहिला क्रमांक गाठला आहे.
चेन्नईच्या या विजयानं पॉईंटस टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत. बर्याच काळापासून नंबर वनवर असलेल्या दिल्ली संघाची दुसर्या स्थानावर घसरण झाली आहे. तर विराटच्या आरसीबीवर टॉप 4 मधून बाहेर पडण्याची भीती आहे. चेन्नई 9 पैकी सात सामने जिंकून 14 गुणांसह अव्वल स्थानी आहे तर दिल्ली देखील 14 गुणांसह दुसर्या स्थानी आहे. नेट रनरेटच्या आधारे चेन्नईनं नंबर वन गाठला आहे.
आरसीबीचा नेट रन रेट खराब
आरसीबी सध्या 10 अंकांसह तिसर्या स्थानी आहे. मात्र आरसीबीचा नेच रनरेट खूपच खराब आहे. जर केकेआर आणि राजस्थान आपले पुढील सामने जिंकले तर आरसीबी टॉप 4 मधून बाहेर पडू शकते. केकेआर 8 अकांसह चौथ्या स्थानी आहे. तर राजस्थान देखील 8 अंकांसह पाचव्या नंबरवर आहे.
मुंबईचे देखील आठ गुण असून नेट रनरेटमुळं ते कोलकाता आणि राजस्थानच्या खाली आहेत. पंजाब 6 गुणांसह सातव्या नंबरवर तर हैदराबाद केवळ एका विजयासह दोन गुणांसह शेवटच्या नंबरवर आहे. हैदराबाच्या आशा यंदाच्या आयपीएलमधून संपुष्टात आल्या आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये 421 धावा बनवून दिल्लीचा शिखर धवन ऑॅरेंज कॅप आपल्याकडेच ठेवून आहे. तर 380 धावा करत पंजाबचा कर्णधार केएल राहुल दुसर्या नंबरवर आहे. डु प्लेसिस 351 धावांसह तिसर्या स्थानी आहे.
आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपचा शिलेदार आहे. हर्षलनं 9 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत तर आवेश खान 14 विकेट घेत दुसर्या स्थानी आहे तर क्रिस मॉरिसनं देखील 14 विकेट घेतल्या आहेत.